शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

गारगोटीतील सबपोस्ट कार्यालयाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:22 IST

गारगोटी : गारगोटी येथील सबपोस्ट ऑफिस व डाक निरीक्षक कार्यालय सयाजी कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित करण्यात आले. या कार्यक्रमात पोस्टमास्तर ...

गारगोटी : गारगोटी येथील सबपोस्ट ऑफिस व डाक निरीक्षक कार्यालय सयाजी कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित करण्यात आले. या कार्यक्रमात पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार वर्मा आणि प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील, उद्योगपती सयाजी देसाई हे प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार वर्मा म्हणाले, ग्राहकांना अधिकाधिक तत्पर सेवा पुरवीत आपला विश्वास वृद्धिंगत करत लोकाभिमुख योजना तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील कर्मचारी कधीही कमी पडणार नाही.

प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील म्हणाले, सयाजी देसाई यांच्या सहकार्यातून कार्यालयाला कॉर्पोरेट लूक दिला असून "स्माईल आणि सर्व्हिस्‌" चा नारा कर्मचाऱ्यांना दिला. कोल्हापूर डाक विभागाने देशभरात अव्वलस्थान प्राप्त केले आहे. यामध्ये सर्व कर्मचारीवर्गाचे मोठे योगदान आहे.

यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि जुने खातेदार व एजंटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास उद्योगपती सयाजी देसाई, एएसपी संजय वाळवेकर, पेमेंट बँकेचे कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक अमोल कांबळे, विभागीय व्यवस्थापक भरत पगार, एएसपी संदीप कडगावकर, डाक निरीक्षक राजेंद्र कांबळे-पाटील, गारगोटी डाक निरीक्षक नीलकंठ मंडल, सबपोस्ट मास्तर अनिलकुमार पाटील व गारगोटी उपविभागातील सर्व कर्मचारी, अल्पबचत एजंट, ग्राहक उपस्थित होते.

प्रास्ताविक संजय पताडे, स्वागत संजय वाळवेकर यांनी केले. आभार नीलकंठ मंडल यांनी मानले.

चौकट

कोल्हापूर विभागात भुदरगड तालुक्यातील १७ शाखांद्वारे ५९ गावांना ७५ हजार खातेदारांना सेवा पुरविणारे हे जिल्ह्यातील अग्रगण्य पोस्ट कार्यालय असल्याचे पोस्टमास्टर अनिल पाटील यांनी सांगितले.

२० गारगोटी पोस्ट ऑफिस

फोटो ओळ : उद्‌घाटनानंतर केक कापून आनंदोत्सव साजरा करताना डॉ. विनोद कुमार, ईश्वर पाटील, अनिलकुमार पाटील आदी.