शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

इचलकरंजीत काही इच्छुकांकडून धार्मिक तणाव

By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST

मनोजकुमार शर्मा : समाजकंटकांवर करणार कारवाई

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांकडून धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. त्यांचे गोपनीय अहवाल तयार असून, अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी दिली.शहरातील जवाहरनगरमध्ये डिजिटल फलक व झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन जमावांमध्ये घोषणा-प्रतिघोषणा देत तणाव निर्माण करण्याचे प्रसंग घडले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख व्यक्तींची बैठक कोल्हापूरमधील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये झाली. कोल्हापुरातील या बैठकीसाठी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, विश्व हिंदू परिषदेचे बाळ महाराज, जवाहर छाबडा, अमर माने, शिवसेनेचे शहर अध्यक्ष धनाजी मोरे, मलकारी लवटे, मनसेचे मोहन मालवणकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मेहबूब मुजावर, जाफर मुजावर, पापालाल कलावंत, शौकत मुजावर, शकील मुजावर, राजू बोंद्रे, इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, शिवाजी कणसे, सतीश पवार, आदी उपस्थित होते.इचलकरंजी हे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर असल्यामुळे याठिकाणी जातीयवादी प्रवृत्तींसारख्या अपप्रवृत्ती असणे आणि त्या वाढीला लागणे म्हणजे शहराचा विकास खुंटल्यासारखे आहे. म्हणून शहरातील लोकांनी सजगतेने याकडे पाहिले पाहिजे. इचलकरंजीसाठी येणारा विकास निधी देण्याकरिता जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची भूमिका असून, अशाच तणावाचे आणि धार्मिक तेढ वाढविणारे प्रकार घडू लागले, तर विकास निधी रोखण्याविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)...तर ११० कोटींचा निधी रद्द करू : सैनीयावेळी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी, धार्मिक तेढ वाढल्यामुळे शहराचा विकास खुंटतो; मात्र इचलकरंजीत असेच घडत राहिले, तर शहरासाठी आलेला ११० कोटी रुपयांचा निधी रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला.