शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चंद्रग्रहण, अंबाबाई मंदिरात धार्मिक विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:33 IST

या वर्षातील दुसरा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग बुधवारी कोल्हापूरकरांना मिळाला. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांनी पृथ्वीची सावली चंद्रावर पडायला सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता चंद्रग्रहण सुटले. खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्त मंगळवारी मध्यरात्री अंबाबाई मंदिरात ग्रहणकाळातील धार्मिक विधी करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापुरात चंद्रग्रहण, अंबाबाई मंदिरात धार्मिक विधीखगोलप्रेमी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी चंद्राची स्थिती पाहण्याचा लाभ

 

कोल्हापूर : या वर्षातील दुसरा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग बुधवारी कोल्हापूरकरांना मिळाला. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांनी पृथ्वीची सावली चंद्रावर पडायला सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता चंद्रग्रहण सुटले. खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्त मंगळवारी मध्यरात्री अंबाबाई मंदिरात ग्रहणकाळातील धार्मिक विधी करण्यात आले.

मंगळवारी रात्री नित्योपचाराप्रमाणे शेजारती झाल्यानंतर देवीचा गाभारा बंद करण्यात आला. रात्री पाऊण वाजता देवीचा गाभारा पुन्हा उघडण्यात आला. यानंतर देवीची पूजा व काकडा झाला. पुढे ग्रहणकाळातील अनुष्ठान, विधी झाले. बुधवारी पहाटे साडेचार वाजता ग्रहण संपल्यानंतर अनुष्ठान पूर्ण करून देवीच्या नित्योपचारांना सुरुवात झाली व अभिषेक, पूजा, काकडा व अन्य धार्मिक विधी करण्यात आले.चंद्रग्रहणाविषयी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात वेगळ्या श्रद्धा असल्या, तरी खगोलीय चमत्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा योग अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असते. मंगळवारी मध्यरात्रीपासून या वर्षीच्या दुसऱ्या चंद्रग्रहणाला सुरुवात झाली.

ग्रहण स्थितीत चंद्राचे निरीक्षण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने दुर्बिण लावण्यात आली होती. मध्यरात्री १ वाजून २९ मिनिटांनी चंद्रग्रहणास सुरुवात झाली. त्यानंतर चंद्राची स्थिती बदलत गेली. पहाटे साडेचार वाजता हे ग्रहण सुटले. या ग्रहण काळात खगोलप्रेमी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी चंद्राची स्थिती पाहण्याचा लाभ घेतला. 

 

टॅग्स :scienceविज्ञानkolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर