शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

धार्मिक कार्यक्रम आटोपशीर; भाविकांच्या दर्शनरांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:23 IST

Datta Mandir Kolhapur- कोल्हापूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दत्त जयंती सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले. मात्र, मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. पालखी सोहळाही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये केवळ मंदिर परिसरातून झाला. यावेळी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असा जयघोष करण्यात आला.

ठळक मुद्देधार्मिक कार्यक्रम आटोपशीर; भाविकांच्या दर्शनरांगादत्तजयंती सोहळा : शहरातील दत्त मंदिरात उत्साहाचे वातावरण

कोल्हापूर : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दत्त जयंती सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले. मात्र, मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. पालखी सोहळाही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये केवळ मंदिर परिसरातून झाला. यावेळी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असा जयघोष करण्यात आला.कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत असले तरी धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दत्त जयंती सोहळ्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शहरातील सर्वच दत्त मंदिरांमध्ये नियमांचे पालन करत धार्मिक कार्यक्रम झाले.कॉमर्स कॉलेजजवळील दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरात पुजारी योगेश व्यवहारे आणि युवराज कांबळे यांनी मयूरारूढ रूपातील पूजा बांधली होती. येथे सायंकाळी सहाच्या सुमारास जन्मकाळ सोहळा आणि रात्री साडेआठच्या सुमारास मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा झाला.

दरम्यान, दिवसभर येथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी मुख्य प्रवेश मार्गाऐवजी आझाद चौक येथील प्रवेशद्वारातून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला तर दर्शन घेतल्यानंतर एकविरा देवी मंदिर परिसरातून बाहेर सोडण्यात आले.अंबाबाई मंदिरातील दत्तात्रय देवमठ संस्थान, दत्त गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर, गंगावेशमधील दत्त मंदिर, मिरजकर तिकटीजवळील एकमुखी दत्त मंदिरासह शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्ली, मंगळवार पेठेतील देवणे गल्ली, बागल चौक, सानेगुरुजी वसाहतीतील संतोष कॉलनी, शाहूनगर, आर. के. नगर, रुईकर कॉलनी, विक्रमनगर, महाडिक वसाहत, सम्राटनगर येथील दत्त मंदिरात भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. तसेच प्रज्ञापुरी आणि कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरांतूनही सकाळपासून भाविक दर्शनसाठी येत होते. 

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरkolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम