शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 04:02 IST

उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन १०० रुपयांनी वाढवून ती २८५० करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे. कारण त्याशिवाय ही एफआरपी देणे कारखान्यांना शक्य होणार नाही.गेली दोन वर्षे उसाची एफआरपी २७५० रुपये प्रतिटन कायम होती. यावर्षी त्यात प्रतिटन १०० रुपये वाढ करण्याला आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २८५ रुपये देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात मागील हंगामात उसाचे अपेक्षित उत्पादन झाले नव्हते. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.५० टक्के आहे. त्यामुळे प्रतिटन ३२७७.५० रुपये एफआरपी निघते. त्यातून ऊस तोडणी-ओढणी प्रतिटन ६२५ रुपये वजा जाता उर्वरित २६५२ रुपये ५० पैसे ऊस उत्पादकांच्या हातात मिळतील.>दृष्टिक्षेपात राज्याचा आगामी हंगामउसाचे उत्पादन साखर उत्पादन एफआरपी (तोडणी-ओढणीसह)९०० लाख टन १०५ लाख टन ३२७७.५० रुपये प्रतिटनकेंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय जरी झाला तरी निर्यात दरात वाढ करण्याची मागणी होत आहे.>उत्पादन खर्च वाढत असल्याने वाढीव एफआरपीचे स्वागत करतो. मात्र, त्याबरोबर साखरेचा किमान दर वाढविणे अपेक्षित होते. जर सुपातच नसेल, तर जात्यात कोठून येणार?- पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ