ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:01 AM2020-08-20T04:01:53+5:302020-08-20T04:02:01+5:30

उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे.

Relief to sugarcane growers: Central government's decision to increase FRP by Rs 100 | ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

googlenewsNext

कोल्हापूर : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन १०० रुपयांनी वाढवून ती २८५० करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे. कारण त्याशिवाय ही एफआरपी देणे कारखान्यांना शक्य होणार नाही.
गेली दोन वर्षे उसाची एफआरपी २७५० रुपये प्रतिटन कायम होती. यावर्षी त्यात प्रतिटन १०० रुपये वाढ करण्याला आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २८५ रुपये देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात मागील हंगामात उसाचे अपेक्षित उत्पादन झाले नव्हते. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.५० टक्के आहे. त्यामुळे प्रतिटन ३२७७.५० रुपये एफआरपी निघते. त्यातून ऊस तोडणी-ओढणी प्रतिटन ६२५ रुपये वजा जाता उर्वरित २६५२ रुपये ५० पैसे ऊस उत्पादकांच्या हातात मिळतील.
>दृष्टिक्षेपात राज्याचा आगामी हंगाम
उसाचे उत्पादन साखर उत्पादन एफआरपी (तोडणी-ओढणीसह)
९०० लाख टन १०५ लाख टन ३२७७.५० रुपये प्रतिटनकेंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय जरी झाला तरी निर्यात दरात वाढ करण्याची मागणी होत आहे.
>उत्पादन खर्च वाढत असल्याने वाढीव एफआरपीचे स्वागत करतो. मात्र, त्याबरोबर साखरेचा किमान दर वाढविणे अपेक्षित होते. जर सुपातच नसेल, तर जात्यात कोठून येणार?
- पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

Web Title: Relief to sugarcane growers: Central government's decision to increase FRP by Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.