शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘गडहिंग्लज’च्या सेवक पतसंस्थेत सत्तांतर

By admin | Updated: March 7, 2016 01:31 IST

चव्हाण गटाला धक्का : शिंदे-शहापूरकर गटात नवचैतन्य; सर्व जागा ‘गौळदेव परिवर्तन’कडे

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या गोडसाखर सेवक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी श्री गौळदेव परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी श्री गौळदेव विकास पॅनलेचा धुव्वा उडवून सत्तांतर घडविले. विरोधी पॅनेलने ९ पैकी ९ जागा जिंकल्या. या निकालामुळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण गटाला मोठा धक्का बसला असून, माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे.२५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेच्या आतापर्यंतच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र, दोन वर्षांपूर्वीच्या कारखान्यातील ‘सत्तांतरा’मुळे यावेळची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे व शहापूरकर समर्थक आणि चव्हाण समर्थक कर्मचाऱ्यांत ही चुरशीची लढत झाली. त्यात शिंदे-शहापूरकर समर्थकांनी बाजी मारली.विरोधी गौळदेव परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व मते कंसात - मनोज कदम (३९८) अशोक कुणके (२९३), अरविंद दावणे (३६१), उदय देसाई (३३१), अशोक पाटील (३५९), दिलीप मगदूम (३५४), आप्पाजी कांबळे (४२७), तानाजी नाईक (३५३), एकनाथ कुंभार (३५४).सत्ताधारी गौळदेव पॅनेलचे उमेदवार व मते कंसात - मनोहर देसाई (२५४), रावसाहेब पाटील (२३६), शरदचंद्र पाटील (२८९), येसजी शिंदे (२६३) भाऊसाहेब कोकितकर (२७३), सोमनाथ घेज्जी (२३१) अशोक नाईक (२८४), अशोक कुंभार (२८१), लक्ष्मण कांबळे (२१२). एकूण ६९० पैकी ६४२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष मनोहर देसाई, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व शशिकांत चोथे, विठ्ठल चुडाई, विजय रावण व रमेश मगदूम यांनी केले. (प्रतिनिधी)अध्यक्ष-उपाध्यक्षांचा पराभवसत्ताधारी पॅनेलचे प्रमुख विद्यमान अध्यक्ष मनोहर देसाई व उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह विद्यमान संचालक सोमनाथ घेज्जी यांचा पराभव झाला, तर विरोधी पॅनेलमधून लढलेले मनोज कदम विजयी झाले. ९ जणांच्या संचालक मंडळात ८ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली.