शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अग्नीवीर सैन्य भरतीसाठी ९८ हजार उमेदवार, २२ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात भरती प्रक्रिया सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 18:51 IST

उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

कोल्हापूर : सैन्यदलातील अग्नीवीर भरतीसाठी तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, २२ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी तब्बल ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. राजाराम कॉलेजचे मैदान आणि शिवाजी विद्यापीठातील मैदानावर भरती प्रक्रियेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने दिली.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीवीर भरतीसाठी सुरुवातीला काही राजकीय पक्ष आणि तरुणांच्या संघटनांनी विरोध दर्शविला, मात्र भरती प्रक्रिया सुरू होताच, त्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. २२ नोव्हेंबरपासूून कोल्हापुरात होणाऱ्या अग्नीवीर सैन्य भरतीसाठी ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बेळगावसह गोव्यातील उमेदवारांचा यात समावेश आहे. उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.एकाच दिवशी उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी तालुकानिहाय रोज पाच हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलवले जाणार आहे. राजाराम कॉलेजच्या मैदानावर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांसाठी पाणी आणि शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे. व्हाईट आर्मी कडून उमेदवारांसाठी अन्नछत्र चालवले जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.आदल्या दिवशीच उमेदवारांची गर्दीसैन्य भरतीसाठी येणारे हजारो तरुण भरती प्रक्रियेच्या आधीच एक-दोन दिवस शहरात येतात. जागा मिळेल तिथे तरुण आसरा घेतात. सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने तरुणांची गैरसोय होणार आहे, त्यामुळे टेंबलाईवाडी, उचगाव, सरनोबतवाडी, प्रतिभानगर, सायबर परिसरातील सामाजिक संस्था आणि मंडळांनी तरुणांना राहण्यासाठी हॉल, सभागृहांमध्ये सोय करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर