शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ३५ बांधकाम व्यावसायिकांना महारेराचा दणका, नोंदणी केली रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 12:56 IST

अधिकृत संकेतस्थळावर केली नाही माहिती अपलोड

कोल्हापूर : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकारणाने (महारेरा) कोल्हापुरातील नोंदणीकृत ३५ बांधकाम व्यावसायिकांना कारवाईचा दणका दिला आहे. कायद्यानुसार ‘महारेरा’कडे नोंदणी असलेल्या गृह प्रकल्पाची सद्य:स्थिती दर्शविणारी माहिती अधिकृत संकेतस्थळावर भरणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून माहितीच भरलेली नाही, म्हणून ‘महारेरा’ने ही कारवाई केली आहे. जोपर्यंत ही माहिती अपलोड केली जात नाही तोपर्यंत नोंदणीचे नियमितीकरण होणार नाही.

बांधकाम क्षेत्रातील फसवणुकीचे प्रकार रोखले जावेत आणि या व्यवसायात पारदर्शकता यावी म्हणून महाराष्ट्र रिअर इस्टेट नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्याचे स्वतंत्र कायदे सुद्धा अमलात आले आहेत. या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अर्ज केलेल्या ७६७ पैकी ७४६ गृह प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या सर्व गृह प्रकल्पांची प्रत्येक तीन महिन्यांनी सद्य:स्थिती दर्शविणारी माहिती संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी भरायची असते.

गृह प्रकल्पाचे बांधकाम कधी सुरू झाले, तो कधी पूर्ण होणार आहे. त्यामधील सदनिकांची विक्री तसेच शिल्लक सदनिकांची माहिती भरली जाते. त्यामुळे सदनिका घेणाऱ्या ग्राहकाला योग्य माहिती मिळते आणि त्याची फसवणूक होत नाही. अशी माहिती अपलोड करणे कायद्यानेच बंधनकारक करण्यात आले आहे.कोल्हापुरातील ३५ गृह प्रकल्पांची सद्य:स्थिती दर्शविणारी माहिती संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी भरलेली नाही. ‘महारेरा’कडून त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, तरीही माहिती अपलोड केली नाही, म्हणून महारेराला कायद्याचा बडगा उगारून त्यांच्यावर नोंदणी रद्दची कारवाई करणे भाग पडले. जोपर्यंत ही माहिती अपलोड केली जाणार नाही तोपर्यंत नोंदणीचे नियमितीकरण केले जाणार नाही. त्यामुळे सदनिका विक्रीही करता येणार नाही, असे सांगण्यात आले.माहिती अपलोड न करणे हा काही गंभीर अपराध नसला तरी बांधकाम व्यावसायिकांनी एकदा नोंदणी केल्यानंतर पुढील व्यवहार कायद्याला अनुसरून करावे, असे अपेक्षित आहे. काही कारणांनी माहिती अपलोड करण्याचे राहून जाते. त्यामुळे पुढील काळात गृह प्रकल्पांची माहिती अद्ययावत करून नोंदणीचे नियमितीकरण करता येऊ शकते.

  • कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत गृह प्रकल्प - ७४६
  • रेराकडे प्राप्त तक्रारींची संख्या - ५८
  • नोंदणीकृत प्रकल्पांना आदेश प्राप्त - ३८
  • नोंदणीकृत एजंटांची संख्या - १२१
टॅग्स :kolhapurकोल्हापूर