शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीसाठी नावनोंदणी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:03 IST

elecation, Voting, collector, kolhapur भारत निवडणूक आयोगाने आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२१ पासून मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

ठळक मुद्दे मतदार यादीसाठी नावनोंदणी करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई १५ डिसेंबरपर्यंत दावे, हरकती स्वीकारणार

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२१ पासून मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

मतदार यादीत नावनोंदणीसाठी पात्र, मात्र मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा तसेच  https://www.nvsp.in/ या आयोगाच्या प्रणालीवर ऑनलाईन सादर करावे. तसेच, १५ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिली.

मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. यावरील दावे व हरकती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय (निवडणूक शाखा) यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे.दावे हरकती स्वीकारण्याचा कालावधी : १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदावे, हरकती निकाली काढणे : ५ जानेवारी २०२१मतदार यादी तपासणी : १४ जानेवारी २०२१अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : १५ जानेवारी २०२१मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी, यादीतील नाव वगळण्यासाठी, तपशिलातील दुरुस्ती, एकाच मतदार संघात मतदार यादीच्या नोंदीचे स्थानांतर या कारणांसाठी अर्ज करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या  https://www.nvsp.in/ या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करताना मतदारांनी यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक अचूक नमूद करावेत. मतदार यादीत नावाची नोंद असेल तरच निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावता येतो. तरी आपली नोंदणी प्राधान्याने करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर