शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

कोल्हापूरच्या कलासंस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार

By admin | Updated: December 19, 2014 00:16 IST

संस्कृती संमेलन : सिद्धगिरी कणेरी मठावर १९ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजन

कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर व भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील चौथ्या भारतीय संस्कृती संमेलनात कोल्हापूरच्या कलापरंपरेचे आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रांचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. कणेरी मठ येथे १९ ते २५ जानेवारीदरम्यान होत असलेल्या या महोत्सवात कोल्हापूरचे कलावंत कलानगरीच्या अभिजात कलासंस्कृतीच्या आविष्कारातून चित्र-शिल्प, नृत्य-नाट्य, गायन-वादन, आदी लोककलांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होईल, असे भव्य कलादालन उभारणार आहेत. यातील एक दालन कलानगरीच्या इतिहासास उजाळा देणाऱ्या कोल्हापूर आर्ट स्कूल परंपरेचे असणार आहे. त्यात चित्र-शिल्प परंपरेच्या कलाकारीच्या कलाकृती येथे प्रदर्शित केल्या जाणार आहेत. त्याबरोबर भारताची राजमुद्रा असणारे सिंह स्तंभशीर्ष, देव-देवतांच्या मूर्ती, हस्तकला, पारंपरिक खेळ, लोकजीवन या विषयांची शिल्पे मांडण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील कलामंदिर महाविद्यालयाने ही जबाबदारी उचललेली आहे. या़शिवाय कोल्हापूरची प्राचीन संस्कृती, इतिहास, वस्तुसंग्रहालयाची अंतर्गत प्रतिकृती वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील यांच्यावतीने मांडण्यात येणार आहे. भारतीय चित्रकलेच्या दालनात भारतातील विविध शैलींतील चित्रे, भारतीय चित्रकार, त्यांच्या कलाकृती व परिचय व त्याबरोबर कोल्हापूरचे कलावंत, दुसऱ्या दालनात भारतीय वास्तू / शिल्प यांमध्ये विविध क्षेत्रे व प्रार्थनास्थळे तसेच ऐतिहासिक वास्तू, मूर्ती, लोकजीवन, शेती, उद्योग यांची छायाचित्रे असणार आहेत. तिसऱ्या दालनात साहित्य, त्यामध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, साहित्यिक यांची छायाचित्रे, साहित्यकृती संशोधनाद्वारे चित्रफलकांद्वारे मांडण्यात येतील. चौथे दालन नाट्य, चित्रपटाचे असून त्यामध्ये भारतीय रंगभूमीची माहिती छायाचित्रांसहीत चित्रफलकाद्वारे मांडण्यात येणार आहे. महोत्सव स्थळाला शाहू महाराजांचे नावमहोत्सव स्थळाला ‘राजर्षी शाहू छत्रपती नगरी’ असे नाव देण्यात आले असून, प्रवेशद्वारात छत्रपतींनी अस्पृश्यता निवारण्यासाठी उचललेले पाऊल म्हणजे गंगाराम कांबळे यांचे सत्यसुधारक हॉटेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट असा प्रबोधनात्मक विषय शिल्पांकित केला जाणार आहे. आतील कलादालनात राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जीवनातील पंचवीस निवडक प्रसंग निवडून त्यांची चित्रमालिका तयार केली जात असून, तिचे काम स्थानिक चित्रकारांनी सुरू केले आहे.