फक्त दोनवेळाच फोन करा...आयुक्त असे का म्हणाले; घरीच रहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 05:23 PM2020-05-02T17:23:43+5:302020-05-02T17:27:10+5:30

तीनही रुग्णालयात रुग्णांजवळ असणा-या नातेवाईकांची अनावश्यक गर्दी कमी करावी, असेही त्यांनी सांगितले.

 Reduce unnecessary crowds of relatives near patients | फक्त दोनवेळाच फोन करा...आयुक्त असे का म्हणाले; घरीच रहा..

फक्त दोनवेळाच फोन करा...आयुक्त असे का म्हणाले; घरीच रहा..

Next
ठळक मुद्देमनपा रुग्णालयात अन्य सुविधा सुरू ठेवाआयुक्त कलशेट्टी यांच्या सूचना- रुग्णांजवळ असणा-या नातेवाईकांची अनावश्यक गर्दी कमी करावी

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले, आयसोलेशन, पंचगंगा हॉस्पिटल नॉन कोव्हिड आजारांकरिता (अपघात, प्रसूती, मधुमेह, मणक्यांचे आजार) रुग्णालयातील सेवा सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. तीनही रुग्णालयात रुग्णांजवळ असणा-या नातेवाईकांची अनावश्यक गर्दी कमी करावी, असेही त्यांनी सांगितले.

कलशेट्टी यांनी कनाननगर येथील पॉझिटिव्ह पेशंटच्या सहवासातील लोकांची माहिती घेऊन त्यांचा दैनंदिन पाठपुरावा करावा, शहरातील घरी अलगीकरण केलेल्या नागरिकांचा दिवसातून दोनवेळा फोनद्वारे पाठपुरावा करून ते घरीच राहतील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

भागातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने सुरू राहतील आणि त्यांच्याकडून ताप, सर्दी, खोकला असलेल्या पेशंटचा दैनंदिन अहवाल प्राप्त करून घेण्याबाबत निर्देश प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी यांना दिले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, प्रशासन अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या काळे व प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
 

 

Web Title:  Reduce unnecessary crowds of relatives near patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.