शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांना पळविण्यासाठी घर व परिसरात लाल पाण्याच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:00 IST

भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. मात्र कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी इथल्या नागरिकांनी एक विचित्र उपाय केला आहे. अनेकांनी घराच्या बाहेर, बिल्डिंग, आॅफिस कार्यालय,या ठिकाणी सगळीकडे लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहेत.

ठळक मुद्देसंख्या आहे तेवढीच त्यांचा उपद्रवही कमी झालेला नाही.असा तर्क नागरिकांनी काढला असून, त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली

उचगाव/कोल्हापूर : उचगाव,सरनोबतवाडी, उजळाईवाडी या उपनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. मात्र कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी इथल्या नागरिकांनी एक विचित्र उपाय केला आहे. अनेकांनी घराच्या बाहेर, बिल्डिंग, आॅफिस कार्यालय,या ठिकाणी सगळीकडे लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहेत. या बाटलीतील पाणी बघितल्यानंतर कुत्रे याठिकाणी येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे.

उपनगरातील अनेक इमारतींच्या प्रवेशद्वारावर तसेच घरासमोर लाल रंगाच्या पाण्याने भरलेल्या बाटल्या पहायला मिळतात. येणाऱ्या -जाणाºयांना याचे कुतूहल वाटत आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे. याची माहिती घेतली असता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही अफलातून कल्पना केल्याचे समजले. यात काही अंशी यश आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उपनगर परिसरात सर्वच भागात मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रस्त्याने ये-जा करताना ही कुत्री सरळ नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या अंगावर धावून जात असतात. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची गरज असताना निर्बिजीकरण केल्यावर कुत्र्यांची नवी पिढी जन्माला येणार नाही. परंतु, कुत्र्यांची सध्याची संख्या आहे. तेवढीच राहिली आहे. त्यांचा उपद्रवही कमी झालेला नाही.

कुंकू किंवा लाल रंगाचा वापर करून हे पाणी तयार करण्यात येत आहे. हे पाणी एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ते घराच्या दाराजवळ ठेवल्यास कुत्रे याठिकाणी येत नाहीत, असा तर्क नागरिकांनी काढला असून, त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली आहे.सत्य काय ?एखादी नवीन वस्तू दिसल्यानंतर माणूसही त्या वस्तूला पाहून घाबरतो. त्याचप्रमाणे कुत्रीही त्या बाटल्यांना किंवा त्यातील लाल रंगाला पाहून घाबरत असावेत, असे प्राणिमित्रांनी सांगितले. 

टॅग्स :dogकुत्राkolhapurकोल्हापूर