शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘बालविकास’ची तयारी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थांच्या पोटात गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 13:06 IST

सरळसेवेने भरती होणार असल्याचे समजून गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

संतोष मिठारी

कोल्हापूर : राज्य शासनाने महिला व बालविकास विभागांतर्गत (गट अ, ब) संवर्गातील पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आणली आहे. नियम सुधारित झाल्यास या विभागातील पदभरतीची परीक्षा राज्यसेवेच्या माध्यमातून घेतली जाईल. त्यामुळे सरळसेवेने भरती होणार असल्याचे समजून गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला आहे. आमची तयारी वाया जाणार असून, करिअरच्या दृष्टीने नुकसान होणार असल्याने राज्यसेवेतून नव्हे, तर पूर्वीप्रमाणे सरळसेवेद्वारे पदभरती करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

महिला व बालविकास विभागातील रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी (गट ब) आणि अन्य समकक्ष असणाऱ्या ४५ पदांची भरती प्रक्रिया सन २०१८ मध्ये सरळसेवेतून झाली. त्यानंतर तीन वर्षे झाली, तरी अद्याप या विभागातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. गट अ आणि ब संवर्गातील पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविण्यात येईल, अशी माहिती या विभागाने शासनाच्या ‘डीजीआयपीआर’च्या ट्विटर हँडलवर गेल्या महिन्यात दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यसेवेतून भरती घेण्यास विरोध का?

- सरळसेवेतून या पदांचा भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत असे दोन टप्पे असतात. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यास थेट नोकरी मिळत असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.- आता राज्यसेवेतून भरती प्रक्रिया राबविल्यास परीक्षेचा अभ्यासक्रम, स्वरूप बदलणार आहे. राज्यसेवेमधून भरती करायची होती, तर या विभागाने सन २०१८ मधील परीक्षा झाल्यानंतर ते जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार आम्ही तयारी केली असती.- सरळसेवेने भरती होणार असे समजून आम्ही गेल्या तीन वर्षांपासून तयारी करीत आहोत. अचानक राज्यसेवेद्वारे भरती केल्यास अडचणीचे ठरणार असल्याने आम्ही विरोध करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या विभागातील समकक्ष पदे

निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था अथवा रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, अधीक्षक, सांख्यिकी अधिकारी गट ब.

विद्यार्थी काय म्हणतात?

गेल्या तीन वर्षांपासून महिला व बालविकास विभागातील रिक्त पदांच्या भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीच्या आणि परीक्षा होण्याच्या प्रतीक्षेत दीड लाख विद्यार्थी आहेत. सेवा प्रवेश नियम बदलल्यास त्याचा आम्ही तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. ते टाळण्यासाठी शासनाने सरळसेवेतून भरती करावी. -अमर पाटील, शाहूवाडी

जर, या विभागातील रिक्त पदे राज्यसेवेतून भरायची होती, तर २०१८ मध्ये शासनाने ते जाहीर करायला हवे होते. आता अचानक सेवा प्रवेश नियमात बदल करणे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. पूर्वीप्रमाणे सरळसेवेमधून भरती करावी. -अमिता नुले, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाStudentविद्यार्थी