शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई मूर्ती सर्वेक्षणासाठी पुरातत्वच्या निवृत्त तज्ञांची नियुक्ती, दिवाणी न्यायाधीशांचा आदेश 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 26, 2024 19:15 IST

४ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या सध्यस्थितीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे निवृत्त अधिक्षक विलास राघवेंद्र मांगीराज, निवृत्त मॉड्युलर आर.एस. त्र्यंबके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवाणी न्यायाधीश व्ही. डी. भोसले यांनी सोमवारी हा आदेश दिला असून तज्ञांनी पाहणीतील निष्कर्ष, मूर्तीची सध्यस्थिती व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल चार एप्रिल पर्यंत अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज होत असून मूर्तीवर २०१५ साली केलेले रासायनिक संवर्धनाचा लेपही आता गळून पडू लागला आहे. मागीलवर्षी नवरात्रौत्सवापूर्वी मूर्तीच्या कानाजवळील भाग दुखावल्यानंत रात्रीतून त्याचे तातडीने संवर्धन करण्यात आले होते. रासायनिक संवर्धनदेखील आता मूर्तीची झीज थांबवू शकत नाही. अशा परिस्थितीत मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे अन्यथा पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी या मागणीचा दावा श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे २०२२ साली दाखल केला होता.या दाव्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसोबतच जिल्हा प्रशासन, राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले. तर ॲड. प्रसन्न मालेकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले आहेत. मूर्तीची अवस्था आज नेमकी काय आहे हे ठरवण्यासाठी तज्ञ लोकांना पाहणीसाठी नेमावे अशा आशयाचा अर्ज मुनिश्वर यांनी २१ मार्च २०२३ मध्ये दिला होता.यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी न्यायाधीश व्ही. डी. भोसले यांनी पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिक्षक विलास मांगीराज व आर एस त्र्यंबके यांना मूर्तीची पाहणी करून तिच्या सध्या परिस्थिती व संभाव्य उपाययोजनांबद्दल न्यायालयाला अहवाल सादर करावा असा आदेश दिला. तसेच या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क पंधरा दिवसात भरावे, वस्तुस्थिती व उपाययोजनांचा अहवाल ४ एप्रिलपर्यंत सादर करावा असे निर्देश दिले. या दाव्यात वादीच्यावतीने ॲड. नरेंद्र गांधी, ओंकार गांधी तर देवस्थान समितीच्यावतीने ॲड. ए. पी. पोवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरCourtन्यायालय