शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात पुन्हा पावसाची रिपरिप,वाहतूक कोंडीसह पाणी साचण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:56 IST

मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत पाणी साचून राहणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा विविध प्रकारांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी या ठिकाणी पाणी साचून राहण्याचा प्रकार झाला; तर शहराच्या काही परिसरांत वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांसह पादचारीही त्रस्त झाले.

ठळक मुद्देशहरात पुन्हा पावसाची रिपरिप, वाहतूक कोंडीसह पाणी साचण्याचे प्रकार वाहनधारकांसह पादचारी त्रस्त

कोल्हापूर : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत पाणी साचून राहणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा विविध प्रकारांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी या ठिकाणी पाणी साचून राहण्याचा प्रकार झाला; तर शहराच्या काही परिसरांत वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांसह पादचारीही त्रस्त झाले.मध्यरात्रीपासून पावसाने शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या सखल भागांत दुपारपर्यंत पाणीच पाणी झाले होते. दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार झाल्याने पाणी साचून राहिले होते. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले.

दुपारनंतर काही प्रमाणात पावसाची उघडझाप सुरू होती. शहराच्या अनेक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे काम करीत होते, तर ड्रेनेज विभागाचे कर्मचारी ड्रेनेजची झाकणे काढून साफसफाईचे काम करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकाचा रस्ता भुसभुसीत झाल्याने या चौकातून वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे महावीर कॉलेजकडून आलेल्या वाहनधारकांना जिल्हा परिषदेच्या अलीकडील चौकातून आपले वाहन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर आणावे लागत होते.त्यामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी आणि वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिवसभर होते.

यासोबत विशेषत: स्टेशन रोड, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी चौक, बिनखांबी गणेश मंदिर, टेंबे रोडवरील साईमंदिर चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, गोखले कॉलेज चौक, शिवाजी टेक्निकल परिसर, माळकर तिकटी, पापाची तिकटी, आदी परिसरांत वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. त्याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीत झाल्याचे चित्र होते. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंट येथून नदीचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरवासीयांनी दिवसभर गर्दी केली होती. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर