शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:44 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी तीन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी २ हजार ४२४ मतदान केले आणि ते तंतोतंत जुळले. कोल्हापुरातील राजाराम तलाव येथील गोदामात सुरू असलेल्या मतदान फेरपडताळणीत हे मतदान झाले आहे. बुधवारपासून पुढे तीन दिवस चंदगडसहकोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनवर ही प्रक्रिया चालणार आहे.विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर विरोधी पक्षातील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांच्या फेरपडताळणीची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून मॉकपाेल प्रक्रियेला सुरुवात झाली. राजाराम तलावाशेजारच्या शासकीय गोदामात एकाच हॉलमध्ये मतदान प्रक्रिया झाली.यावेळी प्रतिनिधी दहा ते बारा आणि कर्मचारी मात्र शंभर उपस्थित होते. आमदार शिवाजी पाटील यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून भारती जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर-कुपेकर यांच्यावतीने दिलीप पाटील तसेच अपक्ष उमेदवार संतोष चौगुले यांच्यावतीने मानसिंग देसाई हे प्रतिनिधी उपस्थित होते.सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले. उमेदवारांच्या मागणीप्रमाणे त्यांना विधानसभेला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी दाखवण्यात आली. त्यानंतर हा डेटा काढून टाकून त्याच इव्हीएमवर प्रतिनिधींकडून नव्याने मतदान करून घेतले गेले. त्यानंतर मॉकपोलची मतमोजणी व व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतदान चिठ्ठीची तपासणी करण्यात आली. झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची आकडेवारी तंतोतंत जुळली. यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शक्ती कदम यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, निवडणूक तहसीलदार महेश खिलारी उपस्थित होते.

प्रचंड बंदोबस्तात प्रक्रियाही प्रक्रिया इन कॅमेरा करण्यात आली. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात होता. उमेदवारांचे प्रतिनिधी व मोजके कर्मचारी वगळता कोणालाही आत सोडले नाही. ही प्रक्रिया आज गुरुवार, शुक्रवार व शनिवारीदेखील सुरू राहणार आहे. यात कोल्हापूर उत्तरचा समावेश आहे.

केंद्र क्रमांक : झालेले मतदान

  • केंद्र क्रमांक ३ कोवाडे : ७०७
  • केंद्र क्रमांक ५ निंगुडगे : ९०५
  • केंद्र क्रमांक १०० खणदाळ : ८१२

१४०० मतांच्या आधीच थांबले..वरील तीन केंद्रांवरील प्रत्येक मशीनवर १४०० मतं घेण्यात येत आहेत. हा अधिकार फक्त उमेदवाराला, किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला किंवा अभियंत्याला होता. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी दिवसभर मतदान यंत्रांवर मतदान करत बसले होते. मात्र १४०० मते पूर्ण होण्याआधीच ते थांबले. त्यानंतर मतदानाची पडताळणी केली गेली.