शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

कोल्हापूरचा ऊस गाळप विक्रमाकडे

By admin | Updated: March 14, 2016 00:29 IST

दुष्काळातही १.९५ कोटींचा टप्पा ओलांडला : महिन्याभरात आणखी ३५ लाख टन गाळप

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --कोल्हापूरला कधी नव्हे तो दुष्काळाचा चटका बसल्याने यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार, असाच कयास होता; पण सगळ्यांचे अंदाज फोल ठरवीत कोल्हापूर विभागाची विक्रमी गाळपाकडे वाटचाल सुरू आहे. विभागाने आतापर्यंत १ कोटी ९५ लाख टनांचे गाळप केले असून, शिल्लक ऊस पाहता कारखान्यांची धुराडी अजून महिनाभर पेटतच राहणार असल्याने यंदा हा विभाग २ कोटी ३५ लाख टनांचा टप्पा पार करणार, हे नक्की! हे गाळप आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च राहणार आहे. अलीकडील दहा वर्षांत कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात उसाचे प्रमाण वाढल्याने कोल्हापूरमध्ये सरासरी १ कोटी ३० लाख, तर सांगलीमध्ये ६५ ते ७५ लाख टन ऊस गाळप राहिले आहे; पण यंदा उसाची वाढ सुरू असतानाच पावसाने हुलकावणी दिली आणि त्यानंतर पाण्याची ओढ बसल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार, असा साखर कारखान्यांसह सरकारी यंत्रणेचा अंदाज होता; पण हेक्टरी उत्पादन घटण्यापेक्षा वाढल्याने सगळ्यांचाच अंदाज फोल ठरला. कर्नाटकातील पहिली उचल कमी असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे गेला नसल्याचा परिणामही यात दिसत आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी १ कोटी ३५ लाख ४२ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७७ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप केले होते. यंदा ९ मार्चपर्यंत कोल्हापुरात १ कोटी २५ लाख ५२ हजार, तर सांगलीमध्ये ७० लाख ३८ हजार टनांचे गाळप झाले आहे. विभागातील ३७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शिल्लक ऊस पाहता अपवाद वगळता बहुतांश कारखाने महिनाभर चालतील, असा अंदाज आहे. विभागात दररोज दीड ते पावणेदोन लाख टन उसाचे गाळप होत असल्याने तीस दिवसांत ४० ते ४५ लाख टन अजून गाळप होणार आहे. त्यामुळे काही केले तरी यंदा २ कोटी ३५ लाख टन गाळप होणार, हे निश्चित. गाळपाचा इतिहास पाहिला तर हा उच्चांक होणार आहे. .गाळप वाढले तरी उतारा स्थिर!उसाचे उत्पादन वाढल्याने उताऱ्यात घसरण होईल, असा अंदाज होता; पण आता विभागाचा सरासरी साखर उतारा १२.२७ टक्के आहे. गतवर्षी सरासरी १२.५८ टक्के होता. हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शिल्लक उसाला चांगला उतारा असतो. त्यामुळे उतारा वाढला नसला तरी तो गतवर्षीपर्यंत स्थिर राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.