शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज : सैनी

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

आपत्ती नियोजनासाठी बैठक : नृसिंहवाडीत घेतला तयारीचा आढावा

नृसिंहवाडी : संभाव्य पूरस्थिती व पावसाळ्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सतर्क व सज्ज करण्यात आली असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिला. नृसिंहवाडी येथील दत्त देव संस्थानच्या भक्तनिवास हॉलमध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमाजवळ एकत्रित होऊन नंतर कर्नाटकात जाते. नृसिंहवाडी येथे पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते. संभाव्य पूरस्थिती व पावसाळ्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सतर्क व सज्ज करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत दिली. या बैठकीत त्यांनी संपर्क यंत्रणा हायटेक करण्याचे आदेश दिले. आढावा बैठकीत ते म्हणाले, सुरक्षा यंत्रणा एसएमएस, वॉकी टॉकी, मोबाईल, हॅम रेडिओ सिस्टिम, आदी अनेक आधुनिक साधनांचा वापर करून तत्पर करावी, यासाठी आवश्यक लागणारा पैसा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावा. गावातील तरुणांना ट्रेनिंग द्यावे. आपत्ती, घटनास्थळी ते नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संपर्क यंत्रणा गतिशील ठेवणे अत्यावशक आहे. नदीकाठच्या धोकादायक इमारतींची यादी करून त्या लवकरात लवकर रिकाम्या कराव्यात.यावेळी विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा अहवाल दिला. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, नृसिंहवाडीचे उपसरपंच अभिजित जगदाळे, मुख्याधिकारी कुरुंदवाड नगरपालिकेचे अतुल पाटील, शिरोळचे पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, आदींनी नियोजनाचे अहवाल सादर केले. दत्त देव संस्थानच्यावतीने अमित सैनी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्त देव संस्थानचे विश्वस्त सोमनाथ पुजारी, संजय पुजारी, ग्रा. पं. सदस्य अशोक पुजारी, अनंत धनवडे, गटविकास अधिकारी देसाई, नायब तहसीलदार वैभव पिलारे, सर्कल अधिकारी एन. डी. पुजारी, आदी उपस्थित होते.‘आपत्तीकाळात पशुधन वाचवा’ सदाशिव आंबी यांनी आपत्ती काळात मनुष्य जिवाला वाचविण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा राबविली जाते. मात्र, पशुधन वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, अशी सूचना मांडली. यावर निश्चित विचार करून निर्णय घेण्याची ग्वाही दिली.मोबाईल बंद ठेवू नकाअधिकाऱ्यांनी मोबाईल संच बंद ठेवू नयेत. नैसर्गिक आपत्तीसारख्या आणीबाणीवेळी स्वत:ला त्रास होईल म्हणून आपला मोबाईल संच बंद न ठेवता जनतेच्या सेवेसाठी त्याचा वापर करावा, अशा सक्त सूचना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.शिरोळमध्येही आढावाशिरोळ : जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी बुधवारी शिरोळ तहसील कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करून लोकांची कामे वेळेवर करा, पुढील बैठक ीवेळी प्रत्येकाने सविस्तर माहिती देण्याची तयारी ठेवावी, असे सांगून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.