शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रविकांत तुपकर यांचा ‘स्वाभिमानी’शी संबंध संपला; प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 12:56 IST

काही मतमतांतरे असतील तर चर्चेतून मार्ग निघाला असता; पण..

कोल्हापूर : रविकांत तुपकर हे गेली चार वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेसह दोन राज्य कार्यकारिणीच्या बैठकींना हजर राहिले नाहीत. याउलट ते संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करीत आहेत. चळवळीचे नुकसान होऊ नये म्हणून आतापर्यंत खूप सहन केले. यापुढे स्वाभिमानी संघटना व पक्षाशी तुपकर यांचा संबंध नाही. त्यांचे संघटनेतील योगदान पाहता, त्यांना काढून टाकले हा शब्द आपण वापरणार नाही, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.प्रा. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेली २२ वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली राजू शेट्टी लढत आहेत. स्वर्गीय शरद जोशी यांच्यानंतर कष्टकऱ्यांना आपले वाटणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो; पण, रविकांत तुपकर हे सातत्याने राजू शेट्टी यांच्यावर टीका करीत आहेत. ‘स्वाभिमानी’ संघटना हा परिवार आहे, यामध्ये काही मतमतांतरे असतील तर चर्चेतून मार्ग निघाला असता; पण, तुपकर सोशल मीडियातून सातत्याने चळवळीला हानिकारक वक्तव्य करीत आहेत.

आता तर ते पुण्यात बैठक घेऊन स्वतंत्र सुभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण, २६ सप्टेंबर २०१९लाच तुपकर यांनी स्वाभिमानी पक्ष व संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, तरीही त्यांना राज्य कार्यकारिणीसाठी स्वतंत्रपणे निमंत्रण दिले होते, ते आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा ‘स्वाभिमानी’शी काही संबंध नाही.

अडीच लाख मतांनी हुरळून जाऊ नकारविकांत तुपकर हे लोकसभेला बुलढाण्यातून लढले. त्यांनी मदतीसाठी राजू शेट्टींना फोन केल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले. त्यांना अडीच लाख मते मिळाली, याचा अभिमान आम्हाला आहे, म्हणून त्यांनी हुरळून जाऊ नये, असा सल्लाही प्रा. पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकर