गेली सहा महिने आपल्या न्याय मागण्यांसाठी हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधील रवीकिरण पेपर मिलच्या जवळपास ७० कामगारांनी सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज (गुरुवार)पासून या कामगारांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांनी उपोषण करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत कामगारांचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.
आनंद गणपती पासरे व सोमनाथ गोविंद गावडे पार्ले यांनी सर्व कामगारांतर्फे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, अॅड. सुरेश कुराडे, प्रा. एन. एस. पाटील, जि. प. सदस्या विद्या पाटील, पांडुरंग बेनके, प्रताप डसके, दयानंद देवण, राहुल पाटील, विष्णू गावडे, तानाजी गडकरी, भिकू गावडे, अभय देसाई, परशराम पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला.
--------------------------
* फोटो ओळी : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे रविकिरण पेपर मिलच्या कामगारांच्या उपोषणाला खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांनी भेट दिली.
क्रमांक : १८०२२०२१-गड-०७