शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, हसन मुश्रीफ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:54 IST

आयुष्यभर शरद पवार यांच्या उपकाराखाली रहायचे, आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून जायचे हे योग्य नाही

कोल्हापूर - आयुष्यभर शरद पवार यांच्या उपकाराखाली रहायचे, आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून जायचे हे योग्य नसून जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्षांतर करणा-या नेत्यांवर शरसंधान साधले.  ‘दिस जातील, दिसत येतील भोग सरल, सुख येईल’ असे सांगत हाही बिकट कालावधीतून पक्ष उभारी घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृहात इच्छूकांच्या मुलाखती झाल्या, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादी मधून नेते भाजप-शिवसेनेत उड्यात मारत आहेत, पण तिथे अगोदरच त्यांचे उमेदवार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही.पक्ष असो की व्यक्ती प्रत्येकाचा काही कालावधी खराब असतो. पक्षाध्यक्ष शरद पवार हे ८० व्या वयातही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या उपकारामुळे अनेकांना आमदार, मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पक्षाची अवस्था वाईट असताना, या वयात पवार यांना सोडणे योग्य नाही. जहाज बुडू लागले की पहिल्यांदा भित्री उंदीरे उड्या मारतात. त्याप्रमाणे ही उंदीरे आणि सध्या पक्षांतर करणा-यांमध्ये फरक तरी काय? अशा काळात मुकाबला करायला हवा, राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यासाठी सज्ज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर