शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

रेशन दुकानदारांना प्रतिकार्डमागे पाच रुपये

By admin | Updated: April 3, 2015 23:55 IST

माहिती संकलनासाठी अनुदान : राज्य सरकारकडून सुमारे १७९ कोटींची तरतूद

प्रवीण देसाई -कोल्हापूर -रेशनकार्डची माहिती संकलन करणाऱ्या रेशन दुकानदारांसह संबंधित यंत्रणेला प्रतिकार्डमागे पाच रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी सुमारे १७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यभरातील दुकानदारांकडून शासकीय यंत्रणेला होत असलेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या महिन्यात याचे वितरण शक्य आहे.राज्यात अन्न सुरक्षा योजना सुरू आहे. त्याअंतर्गत राज्य शासनाने बारकोडेड संगणकीकृत रेशनकार्डवर प्रमुख महिलेच्या नावे व फोटोसह कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या समावेशासह देण्याचा व रेशन दुकानांतून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून करण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनकार्डधारकांना संगणकीकृत रेशनकार्ड देण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक यासह अन्य माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी शहरी भागात दुकानदारांचा ऐच्छिक सहभाग घेऊन त्यांना प्रत्येक रेशनकार्डची माहिती संकलित करण्यासाठी प्रति कार्डमागे म्हणजे ग्राहकांकडून भरण्यात येणाऱ्या फॉर्ममागे पाच रुपये मानधन देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे तसेच ग्रामीण भागात प्रामुख्याने रेशन दुकानदारांसह इतरही माहिती संकलित करणाऱ्या यंत्रणेना हे मानधन देण्यात येणार आहे. सध्या संगणकीय रेशनकार्डसाठी माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती संगणकीय प्रणालीद्वारे भरण्याचे कामही सुरू आहे. घरातील वरिष्ठ महिलेच्या नावे रेशनकार्ड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक रेशन दुकानांमधून याबाबतचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. या कामासाठी शहरात रेशन दुकानदार व ग्रामीण भागात प्रामुख्याने रेशन दुकानदार तसेच इतर यंत्रणेला प्रतिकार्डमागे पाच रुपये मिळणार आहेत. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १७९ कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. या महिन्यात हा अनुदान स्वरुपातील निधी राज्यभरातील जिल्हा पुरवठा कार्यालयाला मिळण्याची शक्यता आहे. तो मिळाल्यावर संबंधित रेशन दुकानदाराने संकलित केलेल्या माहितीची शहानिशा करून हे पैसे त्याला हे पैसे पुरवठा विभागाकडून दिले जाणार आहेत.शासनाच्या तरतुदीप्रमाणे रेशन दुकानदारांसाठी दिला जाणारा हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यावर त्याचे संबंधितांना वितरण केले जाईल. - विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी