शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुरवठा विभागातील खाबुगिरीने रेशनचे धान्य काळ्या बाजारात

By भीमगोंड देसाई | Updated: February 12, 2025 17:27 IST

सुट्टीच्या दिवशी हॉटेल, धाबेवाले, विक्रेते यांना विक्री

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : पुरवठा विभागातील खाबुगिरीमुळे गरिबाच्या अन्नावर डल्ला मारून धान्य दर महिन्याला काळ्या बाजारात जात आहे. रेशनच्या गहूपासून रोटी आणि तांदळापासून इडली तयार करण्यासाठी मोठी मागणी असल्याने हॉटेल, धाबेवाले, काही धान्य विक्रेते शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी रास्तभाव दुकानात येऊन घेऊन जात आहेत. यातून धान्य दुकानदार गब्बर होत आहेत. याची तक्रार झाली, तर कारवाई होऊ नये, म्हणून ‘साहेबां’नाही काळ्या बाजारातून कमावलेली कमाई हप्ता म्हणून पोहच करणारे रॅकेट आहे.गडहिंग्लज पूर्व भागातील एका मोठ्या सधन गावातून दर महिन्याला रास्त भाव धान्य दुकानातून पाच क्विंटल गहू, दोन क्विंटल तांदूळ, धाबे, हॉटेलवाल्यांना विकले जात आहे. यामध्ये ‘प्रशांत’ पटाईत असल्याने मॅनेज करून सगळ्यांना ‘खिशात’ घालत आहे. असे प्रकार अनेक गावांत सुरू आहेत.

बायोमेट्रीक प्रणाली असली, तरी सदस्य संख्येनुसार धान्यांचा कोटा असल्याने सर्व सदस्यांचे धान्य न देत काही सदस्यांचेच देऊन त्यातून दुकानदार धान्यांची चोरी करीत आहेत. रेशनकार्ड, सदस्यांचा धान्याचा कोटा वारंवार बदलत असल्याने प्रत्येक रेशनकार्डधारक या महिन्यात शासनाकडून सदस्यनिहाय, कार्डनिहाय धान्य आले किती ? आणि आपल्याला दुकानदारांनी दिले किती ? याचे काटेकोरपणे मेळ घालत नाहीत.ग्रामीण आणि शहरातील उपनगर, झोपडपट्टीतील अनेक दुकानात रेशन नेण्यासाठी अल्पशिक्षीत, ज्येष्ठ नागरिक येतात. ते बायोमेट्रीक करायचे आणि दुकानदार देईल, तितके धान्य घेऊन जातात. कार्डधारकांचे चोरलेले धान्य दुकानदार काळ्या बाजारात विकत असल्याचे आरोप होत आहेत.

रेशनचे धान्य बाजारात आणणारे दलालरेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य गोळा करणारे अशोक, नितीन, मनोज, अरुण, प्रीतम, भरत हे दलाल सक्रिय झाले आहेत. कमाई चांगली असल्याने या दलालांनी पुन्हा उप दलालांची नियुक्ती केली आहे.

नवे एजंट सक्रियकोल्हापूर शहरातील रेशनकार्ड आणि धान्यासंंबंधीची कामे करून देण्याच्या दलालांच्या टोळीत अशोक, गजानन, अरुण हे नवे एजंट सक्रिय झाले आहेत. याच्यावर सध्या पुरवठा प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना हप्ते गोळा करून देण्याची जबाबदारी आहे.

रेशनकार्डमधील पत्ता बदलासाठीही हेलपाटे मारायला लावले जाते. यासाठी दोन ते पाच हजार रुपयांची मागणी केली जाते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पुरवठा विभागातील लाचखोरीला आळा घालावा. - महेश कंदले, त्रस्त, शिवाजीपेठ, कोल्हापूर. 

दिव्यांगांना अंत्योदयचे रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी पुरवठा कार्यालय परिसरातील दलाल पाच हजारांची मागणी करीत आहेत. एकदा दिव्यांग थेट कार्यालयात जाऊन रेशनकार्ड काढण्यासाठी कादगपत्रे दिली, तर एजंट संबंधित दिव्यांगाच्या घरी लाऊन धमकी देतात. - बाळासाहेब पाटील, राज्य सचिव, जिल्हा कार्यध्यक्ष, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ.

कर्नाटक सीमा भागातील रेशनमधील गहू, तांदूळ राष्ट्रीय महामार्गच्या दोन्ही बाजूला असलेल्या धाब्यावर विकला जातो. सीमेलगतच्या गावातील स्वस्त धान्य दुकानातून धाबे, हॉटेलवाले शनिवारी, रविवारी घेऊन धान्य घेऊन जातात. - एक सजग नागरिक, सीमाभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर