शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रेशन ग्राहकांचा दिवाळीचा फराळ होणार गोड अन खुसखुशीत, मिळणार हरभरा, उडीद डाळ अन साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:35 IST

रेशन ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. कारण रेशनवर हरभरा डाळ, उडीद डाळ व साखर माफक दरात मिळणार आहे. मंत्रिमंडळाने यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. प्रति कार्ड एक किलो डाळ व साखर दिली जाणार असून, याचा लाभ जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक ग्राहकांना होणार आहे.

ठळक मुद्देरेशनवर मिळणार हरभरा, उडीद डाळ अन साखर मंत्री मंडळाकडून हिरवा कंदील. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे पाच लाख ग्राहकांना लाभ

प्रवीण देसाई कोल्हापूर : रेशन ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. कारण रेशनवर हरभरा डाळ, उडीद डाळ व साखर माफक दरात मिळणार आहे. मंत्रिमंडळाने यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. प्रति कार्ड एक किलो डाळ व साखर दिली जाणार असून, याचा लाभ जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक ग्राहकांना होणार आहे.रेशन दुकानदारांनी विक्रीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या संख्येत वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यासाठी वारंवार पाठपुरावाही सुरू आहे. ग्राहकांनाही या वस्तू बाजारभावापेक्षा कमी व माफक दरात मिळाव्यात व रेशन दुकानदारांनाही चार पैसे जादा मिळावेत, हा यामागील उद्देश आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून सरकारने ३५ रुपये किलो दराने तुरडाळ विक्रीसाठी सरकारने परवानगी दिली आहे.

त्याचबरोबर आता रेशनवर प्रतिकार्डवर हरभरा डाळ अंदाजे २५ रुपये किलो दराने एक किलो, उडीद डाळ ४० रुपये दराने एक किलो व साखर २० रुपये दराने एक किलो ग्राहकांना देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे.याची अंमलबजावणी दिवाळीत होणार असून, त्यामुळे ग्राहकांचा फराळ गोड आणि खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील १५७२ रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना त्याची विक्री सुरू होणार आहे. रेशन दुकानदारांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.तुरडाळीनंतर हरभरा व उडीद डाळ ही रेशनवर मिळणार असल्याने ग्राहकांसाठी हा सुखद निर्णय आहे. बाजारभावापेक्षा निम्म्याहून कमीदराने या वस्तू मिळणार असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना होणार आहे.

रेशनवर तुरडाळीपाठोपाठ हरभरा, उडीद डाळ आणि साखर देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे; त्यामुळे ग्राहकांना माफक दरात या जीवनावश्यक वस्तू मिळणार असून, अडचणीत असलेल्या रेशन दुकानदारांनाही उत्पन्न वाढीसाठी हे चांगले पाऊल आहे. सरकारने रेशनवर जीवनावश्यक वस्तूंची वाढ करावी, यासाठी पाठपुरावा सुरू असून, तो इथून पुढेही सुरू ठेवला जाईल.- चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर