शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वीज कनेक्शन तोडण्याविरोधात रास्ता रोको, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 08:04 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीज बिलविरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला.

कोल्हापूर : वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणकडून कनेक्शन तोडले जात असल्याच्या विरोधात कोल्हापुरात शुक्रवारी दुपारी  राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप वगळता इतर सर्व पक्षीयांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. पंचगंगा पुलावर दर्ग्यासमोर तासभर पुणे- बंगलोर महामार्ग दोन्ही बाजूंकडून रोखून धरल्याने वाहनांच्या २५ किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीज बिलविरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. भरदुपारी पावणे एक ते पावणे दोन असा तासभर उन्हाच्या कडक झळांची पर्वा न करता आंदोेलकांनी महामार्गावरच ठिय्या मारला. आंदोलनात विक्रांत पाटील किणीकर, प्रताप होगाडे, उदय नारकर, संजयबाबा घाटगे, प्रा. जालंदर पाटील, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

सांगली, उंब्रज येथेही रास्ता रोकोसांगली- इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथेही स्वाभिमानीच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन झाले. उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर पाटण- पंढरपूर हा राज्य मार्ग रोखला. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अरेरावी करू नये, अशी समज दिली. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीagitationआंदोलनelectricityवीजkolhapurकोल्हापूर