शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

क्षीरसागर यांना काँग्रेसकडून ऋतुराज हेच ‘उत्तर’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:14 IST

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून शिवसेनेची पकड असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांतून, तसेच राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून ही पकड

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून शिवसेनेची पकड असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांतून, तसेच राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून ही पकड अधिकच मजबूत केली आहे. क्षीरसागर यांच्या विरोधात दोन्ही कॉँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरूअसून ऋतुराज पाटील यांचे नाव या स्पर्धेत पुढे आहे. त्यांना उमेदवारी देण्यास काँग्रेसकडून काही अडचण नाही. त्यांनी ती स्वीकारायची की नाही हाच अजून संभ्रम आहे. परंतु सध्या काँग्रेसची स्थिती पाहता त्यांना रिंगणात उतरवले जाईल अशाच घडामोडी आहेत.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव आहे. ज्या ज्यावेळी शिवसेनेत बंडखोरी झाली किंवा पक्षांंतर्गत छुपा विरोध झाला, त्या त्यावेळी शिवसेना मजबूत होत गेली. १९९० मध्ये प्रथमच निवडून आलेल्या दिलीप देसाई यांनी बंडखोरी करून पक्ष सोडला तेव्हा त्यापुढील निवडणुकीत सुरेश साळोखे यांना मतदारांनी निवडून दिले. २००९ मध्ये प्रथम राजेश क्षीरसागर यांना पक्षाची उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत प्रचंड विरोध झाला. स्वकीयांनी त्यांच्या विरोधात बंड केले. तरीही क्षीरसागर निवडून आले. २०१४ मध्येसुद्धा त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. तरीही क्षीरसागर विजयी झाले. यावेळीदेखील परिस्थिती गतवेळच्या निवडणुकीसारखीच आहे. पक्ष कार्यकर्ते एका बाजूला आणि क्षीरसागर दुसऱ्या बाजूला आहेत. त्यामुळे क्षीरसागर यांनी स्वकीयांवर अवलंबून न राहता स्वत:ची यंत्रणा तयार ठेवली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना सर्वांत कमी मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले. अंतर्गत गटबाजीचाच हा परिणाम आहे.मागील निवडणुकीत दुसºया क्रमांकावर राहिलेल्या सत्यजित कदम, मालोजीराजे छत्रपती यांनी पक्षाकडे उमेदवारीच मागितलेली नाही. ऋतुराज पाटील आणि मधुरिमाराजे छत्रपती यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.ऋतुराज यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरात संपर्क अभियान राबविले आहे. तरुणांचे संघटन केले आहे. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी समन्वय साधला आहे. या मतदारसंघात कसबा बावडा, लाईन बझार या परिसरात सुमारे तीस हजारांवर मतदान आहे. तिथे ऋतुराज पाटील यांना चांगले पाठबळ मिळू शकते. मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीबाबत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व शाहू छत्रपती यांचे बोलणे झाल्याचा संदर्भही दिला जातो; परंतु ‘न्यू पॅलेस’वरून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे त्या लढण्याची शक्यता फारच धूसर वाटते.

राष्ट्रवादीकडून २००४ साली मालोजीराजे निवडणूक लढण्यास इच्छुक होते; परंतु मतदारसंघ कॉँग्रेसला गेला. तेव्हा शरद पवार यांनीच मालोजीराजेंना कॉँग्रेसची उमेदवारी दिली आणि हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेल्या सुरेश साळोखे यांचा पराभव केला. तीच खेळी यावेळीसुद्धा खेळली जाण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी यांच्यात आघाडी होणार हे स्पष्ट असून काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. कोण लढणार नसेल तर माझी लढायची तयारी असल्याचे व्ही. बी. पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी सागर किंवा सचिन या दोघांपैकी एका मुलाचा विचार करावा, असा आग्रह धरला आहे. गतवेळचे कॉँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांनी कॉँग्रेसचा नाद सोडला आहे. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कसलीही मदत न होता, त्यांनी ४७ हजार मते मिळविली होती. याचा अर्थ काँग्रेसला मानणारा निश्चित असा पारंपरिक मतदार शहरात आहे. यंदा त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, ताराराणी पक्षातर्फे निवडणूक लढतील. महापालिकेत ताराराणी आघाडीचे १९ पैकी १७   नगरसेवक ‘उत्तर’मधील असल्याने त्यांच्या जोरावरच कदम निवडणूक लढवू इच्छितात. माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांची ताकद त्यांच्या सोबत राहील.

मागच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळवूनदेखील भाजपचे महेश जाधव यांना ४२ हजार मते मिळाली होती. यावेळीदेखील आपण निवडणूक लढविणार असल्याचे ते सांगत आहेत. केवळ उत्तरमध्येच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते निर्माण करण्यात जाधव यांचा पुढाकार आहे. शिवसेनेची युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आपण लढण्याची तयारी केली असल्याचे ते सांगतात. मंत्री चंद्रकात पाटील काय आदेश देतील त्याचे पालन करायचे, अशीही त्यांची भूमिका आहे. डाव्या पक्षांची ताकद अगदीच क्षीण असल्यामुळे ते भाजप-शिवसेनेच्या विरोधात राहतील. वंचित आघाडीचा उमेदवार रिंगणात असेल; परंतु त्याचे नाव समोर आलेले नाही.विधानसभा २०१४ च्या निवडणुकीत मिळालेली मतेराजेश विनायक क्षीरसागर (शिवसेना) - ६९ हजार ७३६ (३९.७२ टक्के)सत्यजित शिवाजीराव कदम (कॉँग्रेस) - ४७ हजार ३१५ (२६.९५ टक्के)महेश बाळासाहेब जाधव (भाजप) - ४१ हजार ८०० (२२.८४ टक्के)आर. के. पोवार (राष्टÑवादी) - ९८८७ हजार (५.६३ टक्के)रघुनाथ कांबळे (भाकप) - १५०४ (००.८६ टक्के)सुरेश साळोखे (मनसे) - १३७२ (००७८)इतर चौघांना प्रत्येकी १३०० च्या आत मते

माजी महापौर सागर चव्हाण, प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी, दौलत देसाई हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्टÑवादीकडून व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास इच्छुक आहेत.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघपूर्वरंगविधानसभा निवडणूक

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूरVidhan Bhavanविधान भवन