शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गगनबावड्यातील निवडेत आढळला दुर्मीळ काळतोंड्या बिनविषारी सर्प, तालुक्यात प्रथमच नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:12 IST

वनविभागाने सोडले जंगल अधिवासात

कोल्हापूर : अत्यंत दुर्मीळ असा काळतोंड्या नावाचा बिनविषारी साप गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील शुभम आळवेकर यांच्या घरी आढळून आला. गगनबावडा वनविभागाच्या साळवण येथील रेस्क्यू टीमचे समाधान व्हाेवळे यांनी या सर्पाची रजिस्टरमध्ये नोंद करून त्याला जंगल अधिवासात साेडून दिले.निसर्गाच्या जैवविविधतेने नटलेल्या गगनबावडा परिसरात अनेक पशुपक्षी सरीसृप आढळतात, परंतु या तालुक्यात पहिल्यांदाच दुर्मीळ काळतोंड्या सापाची नोंद झाली आहे. येथील सर्पमित्र महादेव पानारी यांना तालुक्यातील निवडे येथील शुभम आळवेकर यांच्या घरी साप आल्याची माहिती कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून हा साप रेस्क्यू केला. या सापाविषयी जास्त माहिती उपलब्ध नसल्यामुळे सर्पतज्ज्ञ शोएब बोबडे, गणेश कदम यांच्याकडून त्याची अधिक माहिती घेण्यात आली. हा साप गगनबावडा वनविभागाच्या साळवण येथील रेस्क्यू टीमचे समाधान व्होवळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. त्यांनी या सापाची नोंद गगनबावडा (साळवण) वनविभागाच्या रजिस्टरमध्ये नोंदविल्यानंतर या सापाला त्याच्या जंगल अधिवासात सोडण्यात आले.दुर्मीळ कृष्णशीर्ष साप बिनविषारीया दुर्मीळ सापाला काळतोंड्या या नावाने ओळखले जातो. हा बिनविषारी साप असून, याला कृष्णशीर्ष असेही म्हटले जाते. याला इंग्रजीत ड्युमरील्स ब्लॅक हेडेड स्नेक असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव सिबोनोपीस सबकटेटअस् असे आहे. याची लांबी एक ते दीड फूट असते. याचा रंग लालसर तपकिरी असून, शरीरावर छोट्या काळ्या ठिपक्याची रांग असते. काळे डोके, लांब गोलाकार शरीर आणि लांब निमूळती शेपूट हे याचे वैशिष्ट्य आहे. लहान किडे, वाळवी, मुंग्याची अंडी खाऊन तो उपजीविका करतो. अंडी देणारा हा साप देशाच्या मध्यभागापासून दक्षिणेपर्यंत आढळतो. दगडाखाली, लाकडाखाली, पालापाचोळ्यात राहणारा हा साप दिनचर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsnakeसापforest departmentवनविभाग