शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘राफेल’प्रश्नी काँग्रेसचा खोटारडेपणा उघड; केशव उपाध्ये यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 19:23 IST

राफेल विमान करारप्रकरणी किंमत, प्रक्रिया व भागीदार कंपनी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली आहे, असे असतानाही आम्ही म्हणू तेच खरे, या मानसिकतेतून व खोटारडेपणातून कॉँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच विरोधकांची महाआघाडी ही कमजोर असून, जनता त्यांना नाकारून भाजपचे मजबूत सरकार देईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

ठळक मुद्दे‘राफेल’प्रश्नी कॉँग्रेसचा खोटारडेपणा उघड : उपाध्ये यांची टीकास्वार्थापोटी तयार झाली कमजोर महाआघाडी

कोल्हापूर : राफेल विमान करारप्रकरणी किंमत, प्रक्रिया व भागीदार कंपनी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली आहे, असे असतानाही आम्ही म्हणू तेच खरे, या मानसिकतेतून व खोटारडेपणातून कॉँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच विरोधकांची महाआघाडी ही कमजोर असून, जनता त्यांना नाकारून भाजपचे मजबूत सरकार देईल, असा टोलाही त्यांनी लगावला.उपाध्ये म्हणाले, राफेलप्रकरणी उत्तरे देण्याची तयारी असताना ती ऐकून घेण्याची मानसिकता कॉँग्रेसची नाही. सरकारने न्यायालयात याप्रकरणी चुकीची माहिती न देता योग्यच माहिती दिली आहे. देशात होत असलेली विरोधकांची कमजोर महाआघाडी ही स्वार्थापोटी झाली आहे.मोदींना साथ देणारा खासदारकोल्हापूरचा खासदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणारा निवडून येईल, असे विधान उपाध्ये यांनी केले. राम मंदिर हा भाजपसाठी आस्थेचा विषय असून, त्यासाठी आवश्यक त्या घटनात्मक गोष्टी पूर्ण करून तेथे मंदिर उभारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. युतीसंदर्भात सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनता सुज्ञ असून, ती या आघाडीला नाकारून भाजपच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार देईल, असे सांगून विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही; परंतु भाजपकडे नेता, दिशा व विकासाची दृष्टी स्पष्ट असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, बाबा देसाई, आर. डी. पाटील, दिलीप मैत्राणी, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :BJPभाजपाRafale Dealराफेल डीलkolhapurकोल्हापूर