शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कोविड केंद्रात निराधार अल्पवयीन मुलींवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:18 IST

Crimenews Kolhapur : कोल्हापूर येथील महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या डीओटी कोविड केंद्रामध्ये एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर तिथे सेवेस असलेल्या वॉर्डबॉयनेच बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बलात्काराची घटना मेच्या अखेरीस घडली आहे. संबंधित मुलगी संस्थेत आल्यानंतर तिने याबद्दलची माहिती दिल्यावर बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देधक्कादायक ! कोविड केंद्रात निराधार अल्पवयीन मुलींवर बलात्कार वॉर्डबॉय‌‌‌वर पोक्सोन्वये गुन्हा : महापालिकेच्या डीओटी कोविड केंद्रातील घटना

कोल्हापूर : येथील महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या डीओटी कोविड केंद्रामध्ये एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर तिथे सेवेस असलेल्या वॉर्डबॉयनेच बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बलात्काराची घटना मेच्या अखेरीस घडली आहे. संबंधित मुलगी संस्थेत आल्यानंतर तिने याबद्दलची माहिती दिल्यावर बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.एका अनाथ-निराधार मुलींचे संगोपन करणाऱ्या या संस्थेतील १३ मुली १७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. पुढच्या टप्प्यात तीन दिवसांनी आणखी तीन मुली पॉझिटिव्ह आल्या. त्या सर्वांना महापालिकेच्यावतीने शिवाजी विद्यापीठातील डीओटी विभागामध्ये चालवण्यात येणाऱ्या कोविड केंद्रात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या देखभालीसाठी संस्थेने दोन काळजीवाहक महिलाही नियुक्त केल्या होत्या. परंतु कोरोना रुग्णांची जिथे व्यवस्था केली होती तिथे त्यांना सोडण्यात येत नव्हते. या वॉर्डबॉयने त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. संस्थेतील निराधार मुली नेहमीच प्रेमाच्या ओलाव्यास आसुसलेल्या असतात. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत त्याने या केंद्रातील खोलीमध्येच तिच्यावर बलात्कार केला.

अन्य मुलींकडून याची कुणकुण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लागली. त्यांनी तातडीने याची माहिती बुधवारी सकाळीच बालकल्याण समितीला दिली. समितीच्या बैठकीत घडलेल्या घटनेची चौकशी करून राजारामपुरी पोलिसांना संबंधित वॉर्डबॉय‌वर बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याचा निर्णय झाला.महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे संबंधितप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार पीडित मुलीचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले. या कायद्यान्वये संबंधित मुलीस जबाबासाठी पोलीस ठाण्यात बोलावता येत नाही. त्यामुळे संस्थेत जाऊन मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यताडीओटी कोविड केंद्रामध्येडी आणखी काही मुली अशाच प्रकरणी बळी पडल्या असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने समितीमार्फत चौकशी सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षी याच डीओटी कोविड केंद्रामध्ये उपचार घेणा-या एका कोरोना पॉझिटिव्ह युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तेथील एका वॉर्डबॉयला बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. त्या वॉर्डबॉयवर त्याचवेळी राजारामपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पुन्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर