शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुटीमुळे ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी रांगाच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:58 IST

शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या व त्यात मुलांना पडलेल्या उन्हाळी सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विशेषत: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देसलग सुटीमुळे ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी रांगाच रांगा परिसरात पर्यटकांची दिवसभर मांदियाळी

कोल्हापूर : शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या व त्यात मुलांना पडलेल्या उन्हाळी सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विशेषत: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.उन्हाळ्याची सुटी आणि त्यात सलग दोन दिवस मिळालेल्या सुटीमुळे राज्यासह परराज्यांतून पर्यटक भाविक कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. त्यामुळे शनिवार व रविवार अक्षरश: अंबाबाई मंदिराचा परिसर फुलून गेला होता. परिसरातील हॉटेल्स, यात्री निवास, धर्मशाळांवर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लागले होते. अंबाबाईच्या दर्शनानंतर भाविकांनी जवळील ठिकाण म्हणून प्रथम टाऊन हॉल बागेतील संग्रहालय आणि न्यू पॅलेस व त्यानंतर ‘दख्खनचा राजा’ जोतिबा-पन्हाळा दर्शन असा बेत आखला होता. त्यामुळे दिवसभर या परिसरात गर्दीच गर्दी दिसून येत होती.

भाविकांचे जथ्येच्या जथ्ये महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, चप्पल लेन, छत्रपती शिवाजी चौक येथे दिसत होते. परराज्यांहून आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर कोल्हापुरी जेवणावर ताव मारला. त्यामुळे दुपारी शहरातील हॉटेल्समध्येही गर्दी दिसत होती.

गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापुरात दाखल झाल्याने वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला होता. त्यात बिंदू चौक, शिवाजी चौक, स्टेशन रोड, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गासह ताराराणी चौक आदी ठिकाणी वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात होती. शहर वाहतूक शाखेनेही विशेष पोलीस फौजफाटा या वाहतूक नियंत्रणासाठी शहराच्या गजबजलेल्या चौकात तैनात केला होता. त्यामुळे वाहतूक विना अडथळा सुरू होती.

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरtourismपर्यटन