शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रंग बरसे... सखी सदस्यांसाठी रंगपंचमी सखी मंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 13:14 IST

रंगांचा उत्सव रंगपंचमी, या दिवशी सगळे हेवेदावे विसरून आपण रंगांची उधळण करतो आणि मैत्रीचे नाते घट्ट करतो. सखी सदस्य ही चक्क एक दिवस आधी रंगपंचमीचा उत्सव साजरा करणार आहे. हा कार्यक्रम रविवार २४ मार्च २०१९ रोजी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे सकाळी ११ ते चार या वेळेत होणार आहे.

ठळक मुद्देरंग बरसे... सखी सदस्यांसाठी रंगपंचमी सखी मंचलोकमत सखी मंचचे आयोजन

कोल्हापूर : रंगांचा उत्सव रंगपंचमी, या दिवशी सगळे हेवेदावे विसरून आपण रंगांची उधळण करतो आणि मैत्रीचे नाते घट्ट करतो. सखी सदस्य ही चक्क एक दिवस आधी रंगपंचमीचा उत्सव साजरा करणार आहे. हा कार्यक्रम रविवार २४ मार्च २०१९ रोजी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे सकाळी ११ ते चार या वेळेत होणार आहे.सखी मंचसाठी नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. सण-समारंभ यांचे निमित्त साधून आपल्या परंपरा जपण्याचा प्रयत्न सखी मंच करत असते. २४ मार्च रोजी सगळ्या सख्यांसाठी रोजच्या धावपळीच्या रुटीनमधून थोडावेळ स्वत:साठी जगण्यासाठी हा कार्यक्रम आहे. सगळे टेन्शन विसरून सखी एकत्र येणार आणि धम्माल करणार आहेत.

या ठिकाणी वॉटर गेम्स, रेन डान्स, कोरड्या रंगांची रंगपंचमी अल्पोपहार आणि धमाल डीजेसोबत ही रंगपंचमी साजरी होणार आहे. सर्व सखींनी कार्यक्रमासाठी पांढरा पोशाख परिधान करावा. सखी सदस्यांसाठी नाममात्र १६० रु. शुल्क, तर इतर महिलांसाठी २५० रु. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी १६० रु. आकारले जातील.

या कार्यक्रमाचे पासेस लोकमत कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत उपलब्ध आहेत. मर्यादित पास असल्याने लवकरात लवकर आपले पास न्यावेत. अधिक माहितीसाठी ७९७२३९२०२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. पासेस नेण्यासाठी गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत यावे. 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर