शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या सरकारविरोधात तालुक्यात रान पेटवा : प्रकाश आवाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:52 IST

गोरगरिबांच्या तोंडचे धान्य काढून घेणाऱ्या केंद्र व राज्यातील फसव्या सरकारविरोधात तालुक्या तालुक्यात रान पेटवा, असे आवाहन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केले. बचावात्मक राहण्याचा काळ संपला असून, कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन सरकारला उघडे पाडा, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देफसव्या सरकारविरोधात तालुक्यात रान पेटवा : प्रकाश आवाडे कॉँग्रेसच्या बूथ कमिटी आढावा बैठकीत आवाहन

कोल्हापूर : गोरगरिबांच्या तोंडचे धान्य काढून घेणाऱ्या केंद्र व राज्यातील फसव्या सरकारविरोधात तालुक्या तालुक्यात रान पेटवा, असे आवाहन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केले. बचावात्मक राहण्याचा काळ संपला असून, कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन सरकारला उघडे पाडा, असेही त्यांनी सांगितले.बूथ कमिट्या व शक्ती अ‍ॅपची आढावा बैठक बुधवारी कॉँगेस कमिटीत झाली, त्यामध्ये ते बोलत होते. कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल यांच्या अनुपस्थितीत प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पी यांनी आढावा घेतला. आवाडे म्हणाले, संजय गांधी निराधार पेन्शन, धान्य, रॉकेल, गॅस नागरिकांना मिळत नाही, घरकुलसाठी जाचक अटी घातल्या आहेत. या सर्वांमुळे जनतेत कमालीचा रोष आहे.

सामान्य माणूस हवालदिल झाला असून, त्याला आधार देण्याचे काम कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. आता मरगळ झटकून कामाला लागा, दर १५ दिवसाला तालुका कार्यकारिणीचा आढावा घेणार आहे. महिन्याला सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाची माहिती घेतली जाईल. यशवंत हप्पी म्हणाले, सरकारच्या धोरणावर सामान्य माणूस कमालीचा नाराज आहे, तो कॉँग्रेससोबत पुन्हा सक्रीय होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी त्याला विश्वास दिला पाहिजे.

अ‍ॅड. सुरेश कुराडे, सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, शहराध्यक्ष संध्या घोटणे, आदी उपस्थित होते. बैठकीनंतर हप्पी यांनी तालुकाध्यक्षांशी स्वतंत्र चर्चा केली.

मग तो नेता खोटे बोलतोयआमच्यातील भांडणाला पूर्णविराम दिला आहे. तरीही कोणी वाद असल्याचे सांगत असेल तर तो नेता खोटे बोलतोय, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही आवाडे यांनी केले.काम करा अन्यथा बदल निश्चिततालुकाध्यक्ष ४0 वर्षे आहात, हे चांगले असले, तरी नवीन पिढीला सोबत घेऊन काम करा, असा सल्ला आवाडे यांनी गगनबावडा तालुकाध्यक्ष बजरंग पाटील यांना दिला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कॉँग्रेसचे विचार वेगाने पुढे घेऊन जा. तुम्ही आहे तिथेच थांबणार असाल तर आम्हाला वेगाने पुढे जाणारा तालुकाध्यक्ष निवडावा लागेल. असा इशाराही त्यांनी दिला.कॉँग्रेस कमिटीत वॉररूमलोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर ताकदीने केला जाणार आहे. यासाठी कॉँग्रेस कमिटीत वॉररूम केली असून, येत्या आठ दिवसांत ती कार्यान्वित होईल, असेही आवाडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर