शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

तरुणावरील तलवारीचा वार रणरागिणीने झेलला अंगावर

By admin | Updated: February 17, 2017 22:45 IST

शाहूनगरमधील घटना : होस्टेलमधील विद्यार्थ्याचा वाचविला जीव; घटनेचा थरार सोशल मीडियावर व्हायरल; चार तरुणांना पोलिसांकडून अटक

 सातारा : होस्टेलवर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारण्यासाठी आलेल्या युवकांच्या टोळक्याच्या तलवारीचा वार एका रणरागिणीने अंगावर झेलला. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याचा जीव वाचला. हा सगळा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.शाहूनगर गोडोली येथे राजयोग होस्टेल आहे. या होस्टेलवर वैभव मालपाणी (वय १९, रा. जालना) हा राहतो. १४ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास चार युवक या होस्टेलवर आले. त्यातील एकाच्या हातात तलवार होती. होस्टेलमधील खोलीमध्ये घुसून आतून दरवाजा लावून वैभवला त्यांनी बेदम मारहाण केली. ही वादावादी सुरू असल्याची माहिती होस्टेलचे व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या शारदा जाधव यांना समजली. त्यानंतर त्यांनी तत्काळ वैभवच्या खोलीकडे धाव घेतली. तोपर्यंत वैभवला त्यांनी प्रचंड मारहाण केली होती. जाधव यांनी त्या युवकांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित मुले वैभवच्या अंगावर धावून जात होती. त्यातील एका मुलाने तर सोबत आणलेली तलवार वैभवच्या अंगावर उगारली. त्याचवेळी शारदा जाधव यांनी त्या मुलाचा हात धरला. जाधव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वैभवचा जीव वाचविला. त्याची ढाल बनून त्या दरवाजाजवळ मुले जाईपर्यंत उभ्या राहिल्या. त्या मुलाच्या हातात तलवार असल्यामुळे मदतीला कोणी धावून आले नाही.रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तत्काळ तेथे पोहोचले. वैभववर हल्ला करणारे ऋतिक शिंदे, आशिष कांबळे, ऋषभ जाधव, सुयोग कदम (रा. गोडोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सगळ्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वैभववर हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैभवने तक्रार दिल्यानंतर चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)तलवार घेऊन खुलेआम फिरणाऱ्या युवकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा कोणी अशाप्रकारचा विचारही करणार नाही.- शारदा जाधव, होस्टेल व्यवस्थापकतलवार घेऊन खुलेआम फिरणाऱ्या युवकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा कोणी अशाप्रकारचा विचारही करणार नाही.- शारदा जाधव, होस्टेल व्यवस्थापकसंबंधित चार मुलांची वैद्यकीय तपासणी करून रितसर अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तलवारही जप्त केली असून ही सर्व मुले जामिनावर सुटली आहेत.- के.एम. फरांदे, तपास अधिकारी