शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तृतीयपंथीयांचे रॅम्पवॉक, राज्यातील पहिला 'फॅशन शो' कोल्हापुरात 

By संदीप आडनाईक | Updated: May 20, 2024 18:11 IST

कोल्हापूर : हम किसींसे कम नहीं म्हणत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील १६ तृतीयपंथीय स्पर्धकांनी सोमवारी कोल्हापुरात रॅम्पवॉक करून समानतेचा ...

कोल्हापूर : हम किसींसे कम नहीं म्हणत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील १६ तृतीयपंथीय स्पर्धकांनी सोमवारी कोल्हापुरात रॅम्पवॉक करून समानतेचा संदेश देत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या फॅशन शोमध्ये इतिहास घडवला. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या रिया मयूरी आळवेकरने प्रथम, मिरजेच्या दीपा नाईकने द्वितीय आणि पुण्याच्या दक्षता पाटीलने तृतीय क्रमांक पटकावला.येथील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग आणि मैत्री फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने नागाळा पार्क येथील रोटरी क्लबच्या सभागृहात दुपारपर्यंत दोन राज्यांतून सहभागी झालेल्या तृतीय पंथीयांनी रॅम्प वॉक करत या फॅशन शोमध्ये भाग घेतला. या शोमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार ट्रॅडिशनल राऊंड, फ्री लान्स राऊंड आणि टॅलेंट राऊंड अशा तीन फेऱ्या पार पडल्या. परीक्षक म्हणून सायबर महिला महाविद्यालयाच्या फॅशन विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योती हिरेमठ, प्रा. प्रज्ञा कापडी आणि मिस इंडिया डॉ. वैदेही पोटे यांनी काम पाहिले. यावेळी वामाज साडीचे गिरीश कर्णावत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मनीषा संकपाळ, सायबरच्या समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. सोनिया राजपूत यांनी सहकार्य केले.

योगिता माने हिची दिलखेचक लावणी

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासोबत ३००० लावणी कार्यक्रम करणाऱ्या योगिता जयंत माने हिने प्रारंभीच दिलखेचक लावणी सादर करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत कोल्हापूरची अंकिता आळवेकर, धुळे येथील ट्रान्समॅन मयूर सोळंकी, पहिला तृतीयपंथीय शिक्षिका सिंधुदुर्गातील रिया मयूरी आळवेकर, कोल्हापूरची स्मिता वदन, मिरजेची दीपा नाईक, बेळगावचा अमेय पाटील, कोल्हापूरची शिवानी बारदेस्कर, मैत्री फाउंडेशनच्या मयूरी आळवेकर, करिना कोळी, झोया दिन्नी, सिद्धी निलंजकर, पुण्याची दक्षता पाटील यांनी भाग घेतला.प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. डॉ. दीपक भोसले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मैत्री फौंडेशनच्या मयूरी आळवेकर, संग्राम संस्थेच्या माया गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी स्मिता कांबळे यांनी आभार मानले. रितेश कांबळे आणि राधिका बुरांडे यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लबचे आकाश बिरंजे, मोहन तायडे, नेहा सूर्यवंशी, पूर्वा सावंत, डॉ. सुरेश आपटे, ॲड. डॉ. अश्विनी बाटे, वैष्णवी पवार, प्रा. पूनम माने, प्रा. शर्वरी काटकर, योगिता माने, पृथ्वी पाटील, संजय देशपांडे, संकेत पाटील, समाजकल्याण तालुका समन्वयक सुरेखा डवर, कोल्हापूर जिल्हा देवदासी समाज संघटनेचे दत्ता पवार, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडर