शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 16:50 IST

कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष कै. रमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याचा त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय लवकरच महासभेत घेतला जाईल, अशी ग्वाही उपमहापौर भूपाल शेटे यांनी बुधवारी येथे बोलताना दिली.

ठळक मुद्देरमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारमहापालिकेतील शोकसभेत उपमहापौरांची ग्वाही

कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष कै. रमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याचा त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय लवकरच महासभेत घेतला जाईल, अशी ग्वाही उपमहापौर भूपाल शेटे यांनी बुधवारी येथे बोलताना दिली.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देसाई यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृह येथे महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी महापौरांच्यावतीने बोलताना शेटे यांनी ही ग्वाही दिली. प्रारंभी महापौर गवंडी यांच्या हस्ते कै. देसाई यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करण्यात आला.देसाई यांनी महापालिका चालली तरच आपला उदरनिर्वाह चालणार आहे असे सांगत महापालिकेचे हित पाहताना कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. सर्वसामान्य कर्मचारी आणि महापालिका हेच त्यांचे कुटुंब होते, अशा भावना यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्या. 

देसाई यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे संघटन कौशल्य वाखाणण्यासारखे होते. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य स्फुर्तीदायी आहे, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले. माजी आमदार सुरेश साळोखे यांनी ६१८ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले.देसाई यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचा आमचा विचार होता, परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता मरणोत्तर पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही घेऊ असे स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी सांगितले. त्यांनी कधीही एकतर्फी निर्णय घेतलेला नाही. तक्रार आल्यास दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन ते योग्य तो निर्णय घेत. महापालिकेच्या इतिहासात कर्मचारी संघास असा नेता कधी लाभणार नाही, असेही देशमुख म्हणाले. देसाई यांचे नेतृत्व कायम लक्षात रहावे यासाठी चौकाला, रस्त्याला अथवा एखादया दवाखान्याला त्यांचे नांव दयावे अशी सुचना आर.के.पोवार यांनी मांडली.संघटनेचे कार्यअध्यक्ष विजय वणकुद्रे, नगरसेवक अजित ठाणेकर, प्रतिज्ञा उत्तूरे, किरण नकाते, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील,आदिल फरास, सचिन चव्हाण, वसंतराव मुळीक, निशिकांत सरनाईक, अनिल घाटगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर