कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाज मुख्यमंत्र्यांविरोधात रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 05:03 PM2017-11-18T17:03:53+5:302017-11-18T17:09:39+5:30

दौंड तालुक्यातील भीमा साखर कारखान्याच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या भावना दुखावल्या. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज शनिवारी रस्त्यावर आला. महाराष्ट्र  नाभिक महामंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून त्याने प्रशासनाचे लक्ष वेधले. या ठिकाणी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला.

A rally on the street, District Collectorate, against the Nuclear Society Chief Ministers of Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाज मुख्यमंत्र्यांविरोधात रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या भावना दुखावल्या. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज शनिवारी रस्त्यावर आला. महाराष्टÑ नाभिक महामंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देअपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाजिल्ह्यातील नाभिक समाज संघटनांचा सहभागकॉँग्रेसच्या ओबीसी सेल अन् बारा बलुतेदार संघाचा पाठिंबा

कोल्हापूर : दौंड तालुक्यातील भीमा साखर कारखान्याच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या भावना दुखावल्या. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज शनिवारी रस्त्यावर आला. महाराष्ट्र  नाभिक महामंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून त्याने प्रशासनाचे लक्ष वेधले. या ठिकाणी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला.


मुख्यमंत्र्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ नाभिक समाजामध्ये संतापाचे वातावरण होते. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्याच्या कानाकोपºयातून एकत्र आलेल्या नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

सकाळी साडेदहाच्या सुमारास दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार गुरू बिराजदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.


राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक व्यवसायाबद्दल चुकीचे वक्तव्य करून तमाम नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. एखाद्या जातिव्यवसायाबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे मुख्यमंत्रिपदाला अशोभनीय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.

मोर्चात सयाजी झुंजार, भारत माने-तिरपणकर, अनिल संकपाळ, अविनाश यादव, दिलीप टिपुगडे, विवेक सूर्यवंशी, रामचंद्र संकपाळ, सूर्यकांत मांडरेकर, सुनील टिपुगडे, विनोद कदम, संग्राम माटे, दीपक माने, दीपक खराडे, तानाजी जाधव, सुनील चव्हाण, किशोर शिंदे, बाजीराव ताटे, विनोद कदम, प्रसाद झेंडे, बाळासो माने, उदय गवळी, बाळासाहेब साळोखे, आदी सहभागी झाले होते.
 

या नाभिक समाज संघटनांचा सहभाग

महाराष्ट्र  नाभिक महामंडळ, करवीर नाभिक क्रेडिट सोसायटी, संत सेना विद्यार्थी वसतिगृह, कोल्हापूर जिल्हा सलून दुकानमालक संघ, संत सेना गृहनिर्माण संस्था, संत सेना युवक संघटना, नाभिक वधू-वर सूचक मंडळ, आदी संस्था संघटना यात सहभागी झाल्या होत्या.

कॉँग्रेसच्या ओबीसी सेल अन् बारा बलुतेदार संघाचा पाठिंबा

या आंदोलनाला जिल्हा कॉँग्रेसच्या ओबीसी सेल व कोल्हापूर ओबीसी बारा बलुतेदार संघाने पाठिंबा दिला. या मोर्चात उमेश पोर्लेकर, रणजित पोवार, वसंतराव वाठारकर, दिलीप ओतारी, आदी सहभागी झाले होते.

भाजपचे नगरसेवक सूर्यवंशी मोर्चात

कोल्हापूर महापालिकेतील भाजपचे गटनेते नगरसेवक विजय सूर्यवंशी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना तुम्ही मोर्चात कसे? अशी विचारणा केली. यावर मी प्रथम समाजाचा घटक असून, त्यांनीच मला मोठे केले आहे. त्यामुळे आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले.
 

 

Web Title: A rally on the street, District Collectorate, against the Nuclear Society Chief Ministers of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.