शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अहो अश्चर्यमं! वय अवघं सहा वर्ष, गुगुल सर्च प्रमाणे पटापट सांगतोय दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याची तारीख, वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:40 IST

गावकर्‍यांना आश्चर्याचा धक्का : अजब ज्ञानाबद्दल कुतहुल

विक्रम पाटीलकरंजफेण : अहो अश्चर्यमं एखादयाने नावजलेल्या विद्यापीठामधून शिक्षण घेऊन यावे आणि विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तर दयावी असाच प्रकार पन्हाळा तालुक्यातील पिंपळे तर्फ ठाणे येथील राजवीर किरण पाटील या पहिलीत शिकणार्‍या बालकाच्या बाबतीत घडलाय. दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याची तारीख, वार असो राजवीर गुगुल सर्च प्रमाणे पटापट सांगतोय. त्याला अजून म्हणावे तसे लिहिता वाचता येत नाही. कोणत्याही वर्षातील सणवार देखील तो तंतोतंत सांगत त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थही आश्चर्यचकीत झाली आहेत.किरण कृष्णात पाटील हे शेती करतात त्यांचा सहा वर्षाचा मुलगा राजवीर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकतोय. त्याच्या शिक्षणाचा श्रीगणेशा नुकताच  झाला आहे.  मुळाअक्षरे, अंकलेखन किंवा इंग्रजीचे ज्ञान अजून तरी अवगत नाही.पण आश्चर्याची बाब अशी की,दिनदर्शिकेतील माहिती मात्र राजवीरला चांगलीच अवगत झाली आहे.  विचारलेल्या प्रश्नाची दिलेली उत्तरे ऐकून ऐकणारा देखील थक्क होऊन जातो. एवढ्या लहान वयात त्याला एवढे ज्ञान आले कुठून हा प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडल्याने ते अवाक झाले आहेत.राजवीरला जर तुम्ही दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याचे व कोणत्याही वर्षाची तारीख, वार, तिथी, जयंती, सणवार विचारले तर तो चुटकीसारख सांगत आहे. पुढे येणार्‍या वर्षभरातील तारीख,वार सण जयंत्या विचारल्या तरी देखील तो  गुगल सर्च प्रमाणे पटापट उत्तर देत आहे. ते पाहून लोक तोंडात बोटे घालत आहेत.राजवीरचे वडील किरण व आई सुषमा यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाल आहे. बहिण मधुरा तिसरीत शिकते. शेतकरी कुटुंबातील या मुलाचा वेगळा अभ्यास घ्यायला कोण नाही..पण त्याचे कोशल्य पाहून लोक अचंबित होत आहेत एवढे नक्की.    

राजवीरच्या कौशल्याबद्दल आम्हाला  कधी काही जाणवले नाही.त्यानेच स्वत:हून आम्हाला दिनदर्शिकेमधील  मला काहीही विचारा म्हणून सांगितले त्यानंतर आम्ही त्यास चालू वर्षातील, मागील आणि आगामी दोन वर्षातील माहिती विचारल्यानंतर त्याने दिलेली उत्तरे पाहून आम्हाला काही कळेनासे झाले. - किरण पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूर