शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे गेले आठ दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा आणि सरकारला जाग येण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन, कीर्तन करत ‘आत्मक्लेश जागर आंदोलन’ केले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, प्रा. जालंधर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, युवराज पवार, विक्रम पाटील, आदी उपस्थित हाेते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो: ०३ कोल- शेट्टी ०४
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश आंदोलनाला गुरुवारी रात्री झुणका भाकरी खावून सुरुवात झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसोबत झुणका-भाकरी खाल्ली. (छाया : नसीर अत्तार)