शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

राजू शेट्टींनी फिरविला आंदोलनाचा चाबूक

By admin | Updated: October 16, 2015 22:18 IST

सरकारला इशारा : शेतकऱ्यांच्या बाजूने राहा; अन्यथा पुढचे वर्ष वाईट

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती, याचे भान ठेवून फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे; अन्यथा मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो, पुढील वर्ष सरकारसाठी वाईट जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘स्वाभिमानी’ने शुक्रवारी कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट इशारा मोर्चा काढत साखर कारखानदारांसह सरकारला तंबी दिली. खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी साखरेचे दर पडल्याने दया दाखवली; पण यावर्षी २८०० रुपये दर आहे. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होणार असल्याने तीन हजारांच्या वर साखरेचे दर जातील. त्यामुळे एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास अडचण येणार नाही. तरीही कारखानदारांनी रडीचा डाव केला, तर त्यांच्या छाताडावर बसून ‘एफआरपी’ वसूल केल्याशिवाय राहणार नाही. साखर कारखान्यांच्या सभेत टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचे बेकायदेशीर ठराव केले आहेत. हे ठराव त्यांना मागे घ्यावे लागणार आहेत. तसेच राज्यातील विभागीय साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून इशारा देणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत सरकार काय करते ते बघूया. सरकार कारखानदारांच्या बाजूने राहिले तर सरकारविरोधात बंड करावे लागेल. यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत , वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर, सतीश काकडे, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, या मागणीचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ६९ हजार २६८ शेतकऱ्यांचे अर्ज प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पृथ्वीराज जाचक, माजी आमदार नानासाहेब माने, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती सीमा पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, अनिल मादनाईक, जयकुमार कोल्हे, आदी उपस्थित होते. मंत्री समितीत अजित पवारांचे काय काम?मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक असते. त्यात सहकार, कृषी, अर्थमंत्र्यांसह संबंधित खात्याचे सचिव व आयुक्त असतात; पण यावर्षीच्या बैठकीला अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांना का बोलावले होते? याचे उत्तर सरकारने द्यावे, असे शेट्टी यांनी सांगितले. बिगर शेतकरी मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांच्या बाजूने महाराष्ट्राच्या इतिहासात बिगर शेतकरी मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांच्या बाजूने राहिले आहेत. बॅ. ए. आर. अंतुले यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तर मनोहर जोशी यांनी झोन बंदी उठवली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने राहतील, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. लाल दिव्यापेक्षा छातीवरचा लाल बिल्ला महत्त्वाचामंत्रिपदासाठी आम्ही कधीच तडजोड करणार नाही. लाल दिव्यापेक्षा छातीवरचा लाल बिल्ला महत्त्वाचा असून, त्यामुळेच महाराष्ट्रात माझी ओळख व किंमत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘स्वाभिमानी’ने आवळली मूठ..! ऊसकरी शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’ मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला व देवेंद्र फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर सरकार हलविल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील शेतकरी रखरखत्या उन्हातही हातात उसाचे कांडे घेऊनच मोर्चात सहभागी झाले होते.