शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप  

By राजाराम लोंढे | Updated: November 1, 2024 14:28 IST

जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा : ‘हातकणंगले’तून लढणारच

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राजकारणासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांची चळवळ विकली असून विश्वासघातकी राजकारणामुळे महाराष्ट्रातील एक-एक बिनिचे शिलेदार सोडून जात आहे. चळवळीला ते सत्तेत जाण्याचे साधन म्हणून वापरत आहेत, हे घातक असून आगामी काळात शेतकऱ्यांचे रक्क सांडून ताकदवान बनलेली चळवळीला ओहोटी लागल्याचे दिसेल, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी टीका केली. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्याकडे दिला. वैभव कांबळे म्हणाले, आतापर्यत शेट्टी यांनी भारत भालके, देवेंद्र भुयार, संजय घाटगे, अमरसिंह पाटील यांना उमेदवारी दिली, पण निवडणूकीनंतर संघटनेकडे त्यांनी पाहिलेही नाही. आताही सुजीत मिणचेकर हेही यापेक्षा वेगळे करणार नाहीत. शेट्टी यांच्या या वागणूकीमुळेच आतापर्यंत रविकांत तुपकर यांच्यासह अनेकजण चळवळीपासून दूर गेले. यावेळी शिवाजी आंबेकर, सुनील पाेवार, सुहास लाटवडेकर आदी उपस्थित हाेते. 

प्रा. पाटील, मादनाईक यांची भूमिका लवकरचपक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील हेही शेट्टी यांच्या भूमिकेने अस्वस्थत आहेत. सावकर मादनाईक यांनी तर उघड भूमिका घेतली आहे. लवकरच या दोघांची भूमिका स्पष्ट होईल, असे कांबळे यांनी सांगितले.

अन् मादनाईक रुग्णालयात‘हातकंगले’त जसे फसवले तसेच शिरोळमध्ये झाले. उल्हास पाटील यांची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सावकार मादनाईक यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आयुष्यभर चळवळीत घालवून ही अवस्था होत असेल तर नेतृत्वाबद्दल काय बोलाचये? असा प्रश्न वैभव कांबळे यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीhatkanangle-acहातकणंगलेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024