शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टी घरातली आणि मनांतली यावर राजीव तांबे साधणार संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 17:40 IST

दहावीचे सरते वर्ष म्हणजे नव्या करिअरच्या संधीचे नवे क्षितीज. एकीकडे सुटीचा आनंद दुसरीकडे पुढे काय करायचे यावर विचारमंथन. या दुहेरी वळणावर विद्यार्थी व पालकांची नेमकी भूमिका काय असावी?, मुलांची सुट्टी पालक आणि मुलांनाही आनंदी कशी घालवता येईल. मुलांच्या करिअरच्या नव्या वाटा कशा चोखंदळता येईल. यावर ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने मंगळवारी (दि. ३०) ‘युनिसेफ’चे शिक्षण सल्लागार राजीव तांबे यांचे ‘खळबळ व सुजाण पालकत्व’ या विषयावर व्याख्यान होत आहे.

ठळक मुद्देसुट्टी घरातली आणि मनांतली यावर राजीव तांबे साधणार संवाद

कोल्हापूर : दहावीचे सरते वर्ष म्हणजे नव्या करिअरच्या संधीचे नवे क्षितीज. एकीकडे सुटीचा आनंद दुसरीकडे पुढे काय करायचे यावर विचारमंथन. या दुहेरी वळणावर विद्यार्थी व पालकांची नेमकी भूमिका काय असावी?, मुलांची सुट्टी पालक आणि मुलांनाही आनंदी कशी घालवता येईल. मुलांच्या करिअरच्या नव्या वाटा कशा चोखंदळता येईल. यावर ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने मंगळवारी (दि. ३०) ‘युनिसेफ’चे शिक्षण सल्लागार राजीव तांबे यांचे ‘खळबळ व सुजाण पालकत्व’ या विषयावर व्याख्यान होत आहे.केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात तांबे हे मुलांच्या विश्वातील प्रश्न आणि पालक, पालकांनी नेमके काय करावे, या विषयांवर मार्गदर्शन करतील. ज्या कुटुंबातील मुलामुलींनी दहावीची परीक्षा दिली आहे, तेथे यानंतर पुढचे करिअर कशात करणार, मुलांच्या आवडीचा विचार करायचा, की ज्या क्षेत्रात जास्त संधी त्याचा विचार करायचा, असा गोंधळ सुरू असतो. दुसरीकडे मुलांच्या हातात मोबाईल येतो आणि त्यांचे विश्व आभासी जगात गुंतून जाते. मुलांनी सतत मोबाईलवर असणं पालकांना आवडत नाही, अशी द्विधा स्थिती असते. त्यांना या कार्यक्रमात उत्तम मार्गदर्शन होवू शकेल.या कार्यक्रमाला मोफत प्रवेश आहे; त्यासाठीचे पासेस सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ लक्ष्मीपुरी व ओम सायन्स अकॅडमी, पद्मावती अपार्टमेंट, जैन गल्ली, रविवार पेठ येथे उपलब्ध आहेत. कार्यक्रमाला लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९७६७२६४८८५ व ९५४५७२९५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

राजीव तांबे यांच्याविषयी..राजीव तांबे हे लेखक, कवी, नाटककार असून, सातत्याने मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यिक आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी देश-विदेशात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या असून, अभिनव शिक्षणपद्धतीवर त्यांचा भर असतो. ‘गंमत शाळा’ ही चळवळ ते राबवितात. त्यांची २२ भाषांतून ९१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर