चंदगड कोविड सेंटरला राजेश पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:01+5:302021-05-16T04:24:01+5:30

यावेळी तहसीलदार विनोद रनवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. ...

Rajesh Patil visits Chandgad Kovid Center | चंदगड कोविड सेंटरला राजेश पाटील यांची भेट

चंदगड कोविड सेंटरला राजेश पाटील यांची भेट

Next

यावेळी तहसीलदार विनोद रनवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. के खोत, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. एस. एस. साने, तळेकर पाणीपुरवठा अभियंता ए. एस. सावळगी, सा. बांधकाम अभियंता जाधव, पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, आदी अधिकारी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांच्या बाबत घेतलेले जे निर्णय झाले, त्या संदर्भात चंदगड ग्रामीण रुग्णालयाला डीसीएचचा दर्जा देऊन, तेथे ऑक्सिजन बेडची सुविधा पूर्ण झाली की नाही त्याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्याचबरोबर कानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा बेडची ऑक्सिजन सुविधा असून तेथे ३० ऑक्सिजन बेडची सुविधा वाढविण्यास सांगितले. चंदगडमधील कोरोनाबाधित रुग्णांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा करून घेण्यात यावी, असे सांगितले.

दरम्यान, फादर स्टीफन्स स्कूलमध्ये सुरू असलेल्या कोविड सेंटरला आमदार पाटील यांनी भेट दिली. सध्या येथे ३० बेडची सुविधा उपलब्ध असून, त्याच ठिकाणी ते १०० बेड वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना केल्या आहेत. तसेच रुग्णसंख्या वाढल्यास हलकर्णी एमआयडीसी येथील आयटीआय मुलांचे वसतिगृह ताब्यात घेऊन तेथे ५० बेड व वेळप्रसंगी राजगोळी येथील नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० बेड कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी व आरोग्य सेवक पुरविण्याच्या संदर्भात विनंती केली असून, याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले .

Web Title: Rajesh Patil visits Chandgad Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.