कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे शासनाने पुनर्गठन केले असून समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविली आहे. जून २०१९ पासून ते यापदावर आहेत. सध्या कोल्हापूरात महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर गटाला ताकद देणारा हा निर्णय आहे.फेरनिवडीनंतर क्षीरसागर म्हणाले, राज्य नियोजन मंडळ हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्त्वपूर्ण विभाग असून, राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना तयार करण्याचे विभागाचे प्रमुख कार्य आहे. मानव विकासावर आधारित योजना राबविण्यासाठी ४०० कोटी रुपये निधी वितरणाचे अधिकार पुढील काळात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्याचा विकास साधण्याचा नक्कीच प्रयत्न करू.विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवली व त्यास मंत्री पदाचा दर्जा दिला. मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारतीमध्ये १८ व्या मजल्यावर या मंडळाचे कार्यालय आहे. या मंडळाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाध्यक्ष असून सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी आहेत.
नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुन्हा राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 20:19 IST
Rajesh Vinayakrao Kshirsagar Shivasena Kolhapur-राज्य नियोजन मंडळाचे शासनाने पुनर्गठन केले असून समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविली आहे. जून २०१९ पासून ते यापदावर आहेत. सध्या कोल्हापूरात महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर गटाला ताकद देणारा हा निर्णय आहे.
नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुन्हा राजेश क्षीरसागर
ठळक मुद्देनियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुन्हा राजेश क्षीरसागरक्षीरसागर गटाला ताकद देणारा निर्णय