यावेळी सत्काराला उत्तर देताना रजत पोवारने माझे वडील एस.एस. पोवार हे कोल्हापूरमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून सी.ए. झालो व पुढे इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेची तयारी केली व त्यामध्ये घवघवीत यश संपादन केले. याचे खरे श्रेय माझ्या आई- वडिलांचे आहे, अशी प्रतिक्रिया रजत पोवार यांनी व्यक्त केली. संस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार शिवाजी पाटील यांनी रजत पोवार यांनी आंतरराष्ट्रीय करप्रणाली या परीक्षेमध्ये भारत देशात प्रथम क्रमांक मिळविला. याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास चार्टर्ड अकाउंटंट एस.एस. पोवार, प्रमाणित लेखापरीक्षक एल.डी. कांबळे, संस्था सचिव आर.एस. गणबावले उपस्थित होते. आभार संस्थेचे सदस्य रवींद्र चव्हाण यांनी मानले.
फोटो कोलडेस्कवर पाठवला आहे.