शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

राजकोट येथे राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कार्यक्रम, खासदार संभाजीराजे यांना विशेष निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:20 IST

राजर्षी शाहू छत्रपती महाराज १८८६ ते १८८९ या काळात राजकुमार कॉलेज येथे शिक्षणास होते.

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राजकुमार कॉलेज (राजकोट) येथे आज, मंगळवारी दुपारी चार वाजता विशेष कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे प्रमुख उपस्थित असणार आहेत.स्मृती शताब्दी शुक्रवारी (दि. ६ मे) आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराज ज्या ठिकाणी शिकले, त्या गुजरातमधील राजकुमार कॉलेजला याबाबतची माहिती खासदार संभाजीराजे यांनी पत्राद्वारे दिली. राजर्षी शाहू छत्रपती महाराज १८८६ ते १८८९ या काळात राजकुमार कॉलेज येथे शिक्षणास होते.त्यांच्या पत्रास उत्तर देताना कॉलेज प्रशासनाने महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे कळवीत, या कार्यक्रमासाठी खासदार संभाजीराजे यांना निमंत्रित केले. या कार्यक्रमास कॉलेजचे प्रमुख विश्वस्त ठाकूर साहेब जितेंद्रसिंहजी, तर भावनगर येथील राजवाड्यातील कार्यक्रमास भावनगरचे महाराज विजयराज सिंह गोहिल, युवराज जयवीरराज सिंह गोहिल उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापुरातील राजमार्गाला भावसिंहजी रोड नाव

शाहू महाराज राजकुमार कॉलेज येथे शिकत असतानाच त्यांचे सहाध्यायी असलेले भावनगरचे महाराज भावसिंहजी यांच्याशी शाहू महाराजांची चांगली मैत्री झाली. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील राजमार्गाला भावसिंहजी रोड असे नाव दिले, तर भावसिंहजी महाराजांनी आपल्या महूआ येथील राजवाड्यास शाहू पॅलेस असे नाव दिले होते. आजही छत्रपती घराण्याचे भावनगर राजघराण्याशी आपुलकीचे संबंध आहेत.याबद्दल भावनगर राजघराण्याशी देखील मी पत्र व्यवहार केला असता, त्यांनी शाहू महाराजांना आदरांजली देण्यासाठी बुधवार (दि.४ मे) नीलमबाग पॅलेस, भावनगर येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याठिकाणी मी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीGujaratगुजरात