शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्राऊंड रिपोर्ट : राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली, व्यवहारांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:41 IST

Flood Kolhapur : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देराजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली, व्यवहारांची गती वाढली : दुकानांना वेळ वाढवून देण्याची मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे तीन महिने जीवनावश्यक, अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने बंद राहिली. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार दि. १९ जुलैपासून दुकाने सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला. मात्र, तीननंतर जोरदार पाऊस आणि महापुरामुळे पुन्हा चार दिवस दुकाने बंद झाली.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता गेल्या तीन दिवसांपासून दुकाने पूर्ववत सुरू झाली. राजारामपुरी व्यापारपेठेत रेडिमेड गारमेंट, ज्वेलर्स, गिफ्ट आर्टीकल, फूड प्रॉडक्ट, मेडिकल, आदी १,७०० दुकाने आहेत. त्यातील ८० दुकानांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. कोरोनानंतर महापुरातून सावरून दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली आहे.

राजारामपुरी व्यापारपेठ दृष्टिक्षेपात

  • दुकानांची संख्या : १,७००
  • वार्षिक उलाढाल : ७०० कोटी

 

व्यापार, व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी चारपर्यंत आहे. पण, राजारामपुरीतील बहुतांश दुकाने १० वाजता उघडण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. कोरोना आणि महापुराचा बसलेला फटका लक्षात घेऊन शासनाने सर्व दुकाने रात्रीनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. विकेंड लॉकडाऊनही रद्द करावा.-ललित गांधी,अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन

गेल्या तीन दिवसांपासून राजारामपुरीतील आमचे दुकाने पूर्ववत सुरू झाले आहे. ग्राहकांची संख्या वाढत असल्याने व्यवहारांची गतीही वाढत आहे. दुकाने सुरू ठेवण्याची सध्याची वेळ गैरसोयीची ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आम्हा सर्व व्यापाऱ्यांना वाढवून मिळावी.- प्रशांत पोकळे,मालक, बालाजी कलेक्शन

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर