शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

पावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथ, अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 5:01 PM

कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूराचे पाणी ओसरण्याची गती एकदमच संथ आहे. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून ९ राज्य तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे.

ठळक मुद्देपावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथअद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूराचे पाणी ओसरण्याची गती एकदमच संथ आहे. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून ९ राज्य तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे.कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली तरी पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने नदीकाठच्या गावांची अस्वस्थता कायम आहे. पंचगंगेची पातळी ३९.११ फुटांवर कायम असून, ५४ बंधारे पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. रविवारी दिवसभर उघडीप राहिली, तर सोमवारी अधून-मधून सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी उघड-झाप सुरू होती.

महापुरातून अजून कोल्हापूरकर सावरले नसल्याने पावसाचा जोर वाढला, की नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मागील चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यात धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आणि नद्यांनी पुन्हा रौद्र रूप धारण केले.

रविवारी आंबेवाडीसह पूरबाधित गावांचे जिल्हा प्रशासनाने स्थलांतर सुरू केले. पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी नद्यांची पातळी कायम आहे. पंचगंगा नदीची पातळी ३९.१० फुटांवर कायम आहे. जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गगनबावड्यासह पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चंदगड तालुक्यांत पावसाचा जोर आहे. करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगडमध्ये तुलनेने पाऊस कमी असून हातकणंगले, शिरोळमध्ये पूर्णपणे उघडीप राहिली आहे.पिकांचे मोठे नुकसाननदी व ओढ्याकाठचे ऊस, भातपिके अगोदरच कुजली आहेत. या पुराने उरली-सुरली पिकेही कुजू लागली आहेत. सततच्या पावसाने ऊस व भाताची वाढ खुंटली आहे. डोंगरमाथ्यावरील गवतही कुजू लागल्याने ओल्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.पडझडीत ६.५० लाखांचे नुकसानसोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २५ हून अधिक खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये साडेसहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.पातळी स्थिर राहिल्याने स्थलांतर थांबविलेपुराचे पाणी वाढत गेल्याने सुरक्षिततेसाठी शिरोळ ४ गावातून ११२ तर करवीरमधील दोन गावांतून २५९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. कोल्हापूर शहरातील सुतारवाड्यात ९ कुटुंबांतील २८ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले होते.  पावसाचा जोर ओसरला त्यात नदीची पाणी पातळी स्थिर राहिल्याने प्रशासनाने स्थलांतरीत कुटुंबांची मोहीम तूर्त थांबविली आहे.बारा प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यातील ९ राज्य तर प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे. यामध्ये कोल्हापूर-गगनबावडा, रंकाळा-आरळे, गारगोटी-वाळवा, कागल-भोगावती, गगनबावडा-गारवडे, चंदगड-नांदवडे, चंदगड-गौसे-इब्रामपूर, मलकापूर - शित्तूर या मार्गांवरील वाहतूक कोलमडली आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर