शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची विश्रांती : शेतीकामांना वेग, दिवसभर ढगाळ वातावरण, तुरळक सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:20 IST

गेले चार दिवस दमदार हजेरी लावलेल्या पूर्वमोसमी पावसाने शुक्रवारी (दि. १४) पूर्णपणे उघडीप दिली. काही ठिकाणी तुरळक सरीही कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने हवेत उष्मा जाणवत होता. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने ऊन पडले असतानाही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपण्यावर भर दिला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून ऊन झेलतच पेरणीत मग्न असल्याचे चित्र शिवारात दिसत होते. बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवरही झुंबड उडाल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देपावसाची विश्रांती : शेतीकामांना वेगदिवसभर ढगाळ वातावरण, तुरळक सरी

कोल्हापूर : गेले चार दिवस दमदार हजेरी लावलेल्या पूर्वमोसमी पावसाने शुक्रवारी (दि. १४) पूर्णपणे उघडीप दिली. काही ठिकाणी तुरळक सरीही कोसळल्या.

दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने हवेत उष्मा जाणवत होता. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने ऊन पडले असतानाही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपण्यावर भर दिला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून ऊन झेलतच पेरणीत मग्न असल्याचे चित्र शिवारात दिसत होते. बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवरही झुंबड उडाल्याचे चित्र होते.जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली, तर पुन्हा रात्री पाऊस बरसला. शुक्रवारी सकाळीदेखील किरकोळ सरी कोसळल्या; पण त्यानंतर ऊन आणि ढग यांचा लपंडाव दिवसभर सुरू राहिला. आभाळ भरून येत होते; पण पाऊस पडत नव्हता. हवेत उष्माही जाणवत होता, पण वारे सुटले असल्याने त्याची तीव्रता जाणवत नव्हती.

दरम्यान, गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावणाऱ्या होरपळणाऱ्या ऊस पिकाला जीवदान मिळाले आहे. आता ऊस पिकाची वाढ वेगाने होणार आहे. चांगला पाऊस झाल्याने उसातील पाला काढण्यासह शेवटचा खताचा मिरगी डोस देण्याची लगबगही वाढली आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर