शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हाूपर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पातळी कमी; पण अद्याप अठरा बंधारे पाण्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:58 IST

कोल्हाूपर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता उघडीप राहिली. पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळीही घसरू लागली असून, अद्याप अठरा बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे.

ठळक मुद्देकोल्हाूपर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पातळी कमी अद्याप अठरा बंधारे पाण्याखालीच

कोल्हाूपर : जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता उघडीप राहिली. पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळीही घसरू लागली असून, अद्याप अठरा बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे.मागील दोन दिवस जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. शुक्रवारी सायंकाळी पंचगंगेची पातळी ३० फुटांच्या वर पोहोचली होती; पण शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या.

धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली. शनिवारी सायंकाळी पंचगंगेची पातळी २९ फुटांपर्यंत खाली आली. घटप्रभा व कोदे धरणांतील विसर्ग कमी झाला असून, अनुक्रमे प्रतिसेकंद ४०६४ व ४६६ घनफूट विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी मात्र प्रतिसेकंद ८०० घनफूट विसर्ग कायम आहे.

जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १६.५९ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात ४५.८३ मिलिमीटर झाला आहे. कोल्हापूर शहरात एक-दोन सरी वगळता दिवसभर उघडीप राहिली.

पडझडीत ६० हजारांचे नुकसाननादोली (ता. भुदरगड) येथील ज्ञानू हरी पाटील यांच्या घराची भिंत कोसळून दहा हजारांचे नुकसान झाले. तुडये (ता. चंदगड) येथील केरू अवडण यांच्या घराची भिंत कोसळून ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (१.७५), शिरोळ (निरंक), पन्हाळा (८.४३), शाहूवाडी (३५.३३), राधानगरी (१८.३३), गगनबावडा (३२.००), करवीर (३.००), कागल (५.५७), गडहिंग्लज (४.४२), भुदरगड (२४.२०), आजरा (२०.२५), चंदगड (४५.८३). 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर